कगंना राणावत देशद्रोहीच तिला तत्काळ अटक करा राष्ट्रवादी कॉंग्रेसची पोलिसांकडे मागणी

  कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कगंना राणावत हि कलाकार आहे  तिला पुरस्कारही दिला पण तिने  देशातील स्वातत्र्यांबद्दल बेताल वक्तव्य करुन देशभक्तिवर शंका ऊपस्थित केली. देशभक्तिवर घाणेरडं वक्तव्य करुन देशभक्तांचा अपमान केला. आशा घाणेरडं वक्तव्य करणा-या या कगंनाला तत्काळ अटक करून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी कल्याणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.  


याबाबत कल्याण जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा अघ्यक्ष जग्न्नाथ शिंदे, कार्याघ्यक्ष वंडार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सचिव नोवेल साळवे आणि उपाध्यक्ष वल्ली राजन यांच्या शिष्टमंडळाने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा सचिव संतोष पाटील, विजय चव्हाणराष्ट्रवादी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष योगेश माळी, विधानसभा कार्याध्यक्ष उदय जाधव,  भगवान साठेहारून शेखमधुकर व्हालेकरकल्याण (प) विधानसभा कार्याघ्यक्ष प्रकाश हरड आदी पदाधिकारी उपस्थित होते.


अभिनेत्री कंगना राणावत हिने १९४७ साली देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला "भिक मागून मिळालेले स्वातंत्र्य"  अशा पध्दतीने स्वांतत्राचा अपमान केला आहे. भगतसिंगराजगुरूसुखदेवराणी लक्ष्मीबाईवासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू यांच्या सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करीता हसत हसत फासावर बलिदान दिले. या सर्व शहीदांचा कंगना राणावत हिने आपल्या विशारी वक्तव्यातून घोर अपमान केला आहे. 


त्यामुळे देषातील १३२ कोटी जनतेच्या तसेच सगळ्या देषवासीयांच्या भावना दुखावल्या असून, असे बेताल वक्तव्य करणा-या अभिनेत्री कंगणा राणावत हिला देशाचे उच्च व्यक्तीमत्व राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार दिला गेला होता. या पुरस्काराचा देखील अपमान करण्यात आलेला आहे असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांनी सांगितले.


अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो अभिनेत्री कंगणा राणावत हिला देण्यात आलेला आहे. तो तात्काळ केंद्रातील भाजप सरकारने काढून  घ्यावा. अभिनेत्री कंगना राणावत हिला मुंबई पोलिासांनी तात्काळ अटक करूनकोटयावधी भारतीय जनतेला दिलासा द्यावा. जेणे करून पुन्हा भविष्यात कोणीही असे बेताल वक्तव्य करणार नसल्याचे वल्ली राजन यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments