ज्येष्ठ साहित्यिक कै. सुहास शिरवळकर यांची साहित्य संपदा सार्वजनिक वाचनालयाला प्रदान


कल्याण , प्रतिनिधी  : ज्येष्ठ साहित्यिक कै.सुहास शिरवळकर उर्फ सु. शि. यांचे समग्र साहित्य त्यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर यांनी १५७ वर्षाची परंपरा असणारे सार्वजनिक वाचनालय कल्याण यांना प्रदान केली. वाचनालयाच्या सभागृहात रविवारी  साहित्य संपदा प्रदान सोहळा” संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गिरीश दाबके व साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम होते.शिरवळकरांच्या आठवणींना उजाळा देत सु.शिं.च्या जाण्याने साहित्य विश्वातील पोकळी अजूनही जाणवत असल्याची खंत डॉ. गिरीश दाबके यांनी व्यक्त केली. तसेच साहित्यिक इक्बाल शर्फ मुकादम यांनी शिरवळकर हे त्यांच्यासाठी मार्गदर्शक होते. सु. शि. चा वाचक वर्ग विदेशातही पहावयास मिळतो. लेखक कधीही मरत नसतो. तो चिरकाल जिवंत असतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ हे रंगीत असावे आणि त्या पुस्तकातील कथा-कादंबरीच्या विषयाशी निगडीत असे मुखपृष्ठावरचे चित्र असावे. गोष्ट सांगणे हे शिरवळकरांचे वैशिष्ट्य आहे असे सांगत त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.शिरवळकरांचे चिरंजीव सम्राट शिरवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केवळ वाचनालयातच असा वाचक वर्ग असतो की जो प्रत्येक लेखकापर्यंत पोहचतो म्हणूनच सार्वजनिक वाचनालया सारख्या जुन्या वाचनालयाला सु. शिंची सुमारे २५० ते ३०० साहित्य संपदा प्रदान करताना आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ साहित्यिक सुहास शिरवळकर यांचे ग्रंथदालन उभे केल्याबद्दल वाचनालयाचे आभार मानले.  प्रमुख पाहुण्यांनी वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्करचिटणीस  आशा जोशी यांच्याकडे शिरवळकरांचे समग्र साहित्य सुपूर्द केले. शिरवळकरांची साहित्य संपदा आमच्या वाचनालयाला लाभली खऱ्या अर्थाने आमचे वाचनालय समृद्ध झाले असे प्रतिपादन सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले.

Post a Comment

0 Comments