कल्याण, कुणाल म्हात्रे :- कल्याण फोर्टीस् हाँस्पीटल परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास चार जणानी मुगंसाची शिकार केल्याची घटना घडली. स्थानिक दक्ष नागरिकांनी या घटनेची दखल घेत बाजारपेठ पोलीस स्थानकास कळवले.
बाजारपेठ पोलीसनी तातडीने कल्याण वनखात्या कडे गुन्हा वर्ग करीत चार आरोपींना कल्याण वनखात्याच्या ताब्यात दिले. तबयात घेतलेल्या आरोपीना 1 दिवसाची वन खात्याची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून गुरुवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.
साधेदुखीवर मुगंसाचे तेल औषध म्हणून वापर तसेच मुंगूसच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. तसेच मुंगूसला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने या चार जणांनी मुगंसाची शिकार करून हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज सुंत्रानी वर्तवला आहे.
कल्याण वन खात्याचे वन परिक्षेत्र आधिकारी संजय चन्ने यांनी आरोपींना ताब्यात घेतल. संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) आदी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी मांडा टिटवाळा येथील व वासुंद्री रोड याठिकाणी राहणारे आहेत.
सादर आरोपींना भा. व . का. 1972 नुसार अनुसूचि २ भाग २ सादर मुंगूस प्रजाती मोडत असल्याने याअंतर्गत 1 दिवसाची वन खात्याची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहेत. याप्रकरणी वन परिक्षेत्र आधिकारी संजय चन्ने यांच्या मार्गदर्शनखाली एम. डी. जाधव आणि त्यांचे वनरक्षक हे अधिक तपास करत आहेत.
0 Comments