विद्यार्थी भारती सारख्या संघटनेची देशाला गरज आहे : हेमांगी कवी

■विद्यार्थीभारती  संघटनेचा १५ वा वर्धापन दिन संपन्न शाहिद शेतकऱ्यांच्या अस्थीला दिली सलामी..

कल्याण, प्रतिनिधी  :  विद्यार्थी भारती सारखी संघटना आजही तरूणांना घेऊन काम करते ही बाब सुखदायक असून कार्यक्रमात उपस्थित तरुणांच्या मोठ्या संख्येने हेमांगी कवी यांनी आनंद व्यक्त केले. तसेच मुकेश माचकर यांनी देखील विद्यार्थी भारतीच्या या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थी भारती संघटनेच्या १५ व्या वर्धापनदिना निमित्त बालविवाहा विरोधात उल्काकल्लोळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.


कार्यक्रमाची सुरुवात चळवळीच्या गाण्यापासून व लखीमपूर मध्ये चिरडून हत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी कलशला आदरांजली देऊन झाली. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन एका लहान मुलीचे बालविवाह थांबवून समाजाच्या परंपरेने जखडलेल्या बांधनांना तोडून त्या मुलीच्या हातात पुस्तक देऊन कार्यक्रमाच्या उद्घाटक मंजिरी धुरी यांनी केले. लेखिका व नाट्य दिग्दर्शक वंदना खरे,  हेमांगी कवी, अल्का गाडगिळमुकेश माचकरमेहुल मेपाणीहरीश सदानीभरत इराणी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांची भाषणे देखील झाली असल्याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्जुन बनसोडे यांनी दिली.


तसेच कार्यक्रमात अनेक मान्यवरांना विविध पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले. सर्व पुरस्कर्त्यांच्या  सामाजिक कार्याचा आढावा घेत यांना या पुरस्काराने सन्मानित केले असल्याची माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय कार्याध्यक्ष  श्रेया निकाळजे यांनी दिली.


विल्सन कॉलेज, एसएसटी कॉलेज उल्हासनगर तसेच कल्याणडोंबिवली ,विरार,वसईमाणगावसाताराव मुंबईतील अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी बालविवाह विषयाला घेऊन पथनाट्यडान्सएकपात्री अभिनयनाटक विविध कवितांचे सादरीकरण केल्याची माहिती स्पर्धा प्रमुख साक्षी भोईर यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह विरोधी एक ठराव मांडला गेला जो महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविला जावा यासाठी विद्यार्थी भारती लवकरच सरकारची भेट घेईल अशी माहिती महाराष्ट्र  अध्यक्ष पूजा मुधाने यांनी दिली.


कार्यक्रम हा पूर्णपणे लोकनिधीतून उभा राहिला असून मुंबई पोलीस तसेच मुबाईकरांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानत हा कार्यक्रम जरी संपला असला तरीही बालविवाहाला घेऊन वस्तीवस्तीस खेड्यापाड्यात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृतीचे काम चालूच असणार आहे अशी माहिती कार्यक्रम प्रमुख शुभम राऊत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments