एमजी अॅस्टरच्या ग्राहकांसाठी एमजी शील्ड पॅकेजेची घोषणा


 


मुंबई, १४ नोव्हेंबर २०२१ : एमजी मोटर इंडियाने भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही एमजी अॅस्टर गेल्या महिन्यात लॉन्च केली होती. कंपनीने आता संभाव्य ग्राहकांसाठी अद्वितीय माय एमजी शील्ड प्रोग्रामसह आकर्षक डिल सादर केली आहे. अॅस्टरच्या ग्राहकांना निवड करण्याची आणि वॉरंटी एक्स्टेन्शन व प्रोटेक्ट प्लान्सच्या माध्यमातून त्यांच्या मालकीहक्क पॅकेजला वैयक्तिक लुक देण्याची सुविधा आहे. यासंदर्भात १८० हून अधिक संयोजने आहेत.

 


       एमजी अॅस्टर प्रमाणित ३-३-३ पॅकेजसह येते, ज्यामध्ये तीन वर्षे/अमर्यादित किलोमीटर्सची वॉरंटी, तीन वर्षे रोडसाइड असिस्टंस आणि तीन लेबर-फ्री नियतकालिक सेवांचा समावेश आहे. अॅस्टर विभागातील प्रथम ३-६० प्रोग्राम या खात्रीदायी बायबॅक प्लानसह देखील येते, ज्याअंतर्गत ग्राहकांना खरेदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर अॅस्टरच्या एक्सशोरूम किंमतीच्या ६० टक्के रक्कम मिळेल. या प्रोग्रामच्या अंमलबजावणीसाठी एमजी इंडियाने कारदेखोसोबत सहयोग केला आहे आणि अॅस्टर ग्राहक याचा वेगळा लाभ घेऊ शकतात.

 


      एमजीच्या इमोशनल डायनॅमिझमच्या जागतिक डिझाइन तत्त्वानुसार स्टाइल करण्यात आलेल्या अॅस्टरचे लुक समकालीन आहे, जे ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. अॅस्टरच्या आय- स्मार्ट तंत्रज्ञानामध्ये स्मार्ट व शार्प व्हेरिएंटसाठी ८० हून अधिक कनेक्टड कार वैशिष्ट्ये आहेत. एडीएएससह ऑटोनॉमस लेव्‍हल २ वैशिष्‍ट्ये देखील २२० टर्बो एटीमध्ये, तसेच शार्प व्हेरिएंटसाठी व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये ऑप्शनल पॅक म्हणून उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments