गुलाबराव पाटील यांना मानद डॉक्टरेट प्रदान
कल्याण , प्रतिनिधी  :  कल्याण येथील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय येथे गुलाबराव पंडितराव पाटील मागील पंचवीस वर्षापासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.  त्यांच्या शैक्षणिक  व सामाजिक बांधिलकीची दखल घेत महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ओरिसा स्टेट आणि नीती आयोग पुरस्कृत कोरोना योद्धा व मानद डॉक्टरेट पदवी राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच आर. एस. पी.महासमादेशक महाराष्ट्र राज्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्रस्मृतीचिन्ह  देऊन गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.


शालेयसहशालेय उपक्रमातून अष्टपैलू विद्यार्थी घडविणेआजी-आजोबा स्नेहमेळावाबाल जत्राकैदी बांधवांना राखी बांधून सीमेवरील जवानांना राख्या पाठवणेझाडांचा वाढदिवस साजरा  करणे शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पालक व विद्यार्थ्यांकरिता राबवतात.  ते  उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणूनही ओळखले जातात. गुलाबराव पाटील म्हणाले घराची बाजू पत्नी रूपाली पाटील यांनी व्यवस्थित सांभाळल्याने माझ्या कामात त्यांचं सहकार्य मिळालं. शाळासंस्था व सामाजिक कामासाठी पुरेसा वेळ देता आला.


ग्लोबल पीस फाउंडेशनचे आंबेसेटर व डायरेक्टर मणिलाल  शिंपी यांचे  बहुमुल्य मार्गदर्शन लाभलं. आई वडीलांसह संस्था अध्यक्ष पी. टी. धनविजय  यांनी गुलाबराव पाटील यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले.

Post a Comment

0 Comments