सीपीएचएल आणि पी-एमईसी इंडिया एक्स्पोचे १४वे पर्व पुन्हा उभारी धरू पाहणा-या भारतीय फार्मा बाजार पेठेसाठी नव्या संधींची दारे उघडण्यास सज्ज

■या वर्षीच्या हायब्रिड ‘सीपीएचएल पी-एमईसी इंडिया व्हर्च्युअल कॉन्फरन्स’च्या माध्यमातून नव्या संधी ओळखणे आणि सहयोगाचे मार्ग शोधणे हे इन्फॉर्मा मार्केट्सद्वारे आयोजित इंडियन फार्मा वीकचे ठळक वैशिष्ट्य...


दिल्ली, १६ नोव्हेंबर २०२१ :  आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी व्यापार, नवसंकल्पना आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारे मंच निर्माण करणारा अग्रगण्य आंतरराष्ट्रीय बीटूबी इव्हेन्ट्स ग्रुप इन्फोरा मार्केट्स सीपीएचएल अॅण्‍ड पी-एमईसी इंडिया एक्स्पो या दक्षिण आशियाच्या सर्वात मोठ्या फार्मा इव्हेन्टच्या १४व्या पर्वाच्या जल्लोषमय उद्घाटनासाठी सज्ज आहे. 

  
           इंडिया एक्स्पो सेंटर, ग्रेटर नॉयडा, दिल्ली-एनसीआर येथे २४ ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. विविध माध्यमांचा एकत्रित वापर करणारा नाविन्यपूर्ण हायब्रिड मंच व प्रदर्शनाच्या आधी १५-१८ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान आयोजित करण्यात आलेली “सीपीएचएल पी-एमईसी इंडिया व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ हे यावर्षीच्या एक्स्पोचे अनोख वैशिष्ट्य असणार आहे.


       औषधनिर्मिती उद्योगक्षेत्राकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता १६ देशांमधील ५३४ प्रदर्शक या प्रदर्शनामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. सीपीएचएल पी-एमईसी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक खरेदीदार आणि औषधनिर्मिती व उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक यांना, त्याचबरोबर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नियामक मंडळे व धोरणकर्त्यांना एकत्र येण्यासाठी, व्यापाराची बोलणी करण्यासाठी, आर्थिक अनिश्चिततेवर मात करण्यास मदत करणा-या उपाययोजनांवर भर देणा-या नवसंकल्पना मांडण्यासाठी आणि भारतातील देशांतर्गत व्यापाराला मदत करण्यासाठी एक अवकाश उपलब्ध करून देत आले आहे.

Post a Comment

0 Comments