एक्स्प्रेस मधून पडलेल्या वृद्ध महिलेचा आरपीएफने वाचवला जीव कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटना

 


कल्याण , प्रतिनिधी  : एक्सप्रेसमध्ये चढताना थकव्यामुळे हात निसटून खाली पडलेल्या वृद्ध महिलेचा जीव आरपीएफ कर्मचाऱ्याने वाचवल्याची घटना कल्याण स्टेशनवर घडली. 


          कल्याणवरून पुण्याला जाण्यासाठी सरुबाई कासुरडे ही ७१ वर्षीय महिला आज दुपारी कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 वर उभी होती. त्यावेळी पुण्याला जाणारी गाडी आली असता त्या गाडीत चढण्यासाठी पुढे सरसावल्या. मात्र थकवा आणि घामाघूम झाल्यामुळे त्यांचा हात निसटला आणि त्या एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये जाणार त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असणारे आरपीएफ कर्मचारी उपदेश कुमार यांनी क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला पकडले आणि बाहेर खेचले. तोपर्यंत एक्स्प्रेस सुरू झाली होती. 


         मात्र आरपीएफ कर्मचारी यादव यांनी प्रसंगावधान दाखवत सरुबाई कासुरडे यांचा जीव वाचवला. सरुबाई  कासुरडे या पुण्यातील काकडे नगर येथील रहिवासी आहेत. त्यांचा जीव वाचवल्याबद्दल आरपीएफ कर्मचारी यादव यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments