मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना माजी नगरसेवकाची मारहाण

■सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी होणार गुन्हा दाखल...   

 
कल्याण , कुणाल म्हात्रे  : मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचा प्रकार मोहने येथे घडला असून
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल   होत आहे.


          मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी मंदिराच्या चौथर्यावर महापालिकेच्या  "अ" प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त  राजेश सावंत यांच्या  पथकाने तोडक कारवाई केल्याने मनपाच्या कारवाई विरोधात संतापलेल्या ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिल्याने बुधवारी बाजारपेठ बंद पडली.    


          दरम्यान या कारवाईला विरोध करणाऱ्या ग्रामस्थामध्ये आणि पालिकेच्या सहाय्यक आयुक्त राजेश सावंत त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण केल्याने वातावरण तणावग्रस्त बनले आहे. 


 
           बुधवारी "अ" प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांचे पथक मोहने गाव परिसरात मंदिर जीर्णोद्धार होत असलेल्या बांधकामाच्या  चौथर्यावर कारवाई करण्यासाठी दाखल झाले. मंदिरावर कारवाई होत असल्याची माहिती मिळताच गावकरी काही वेळातच मंदिर परिसरात दाखल होत या कारवाईला विरोध झाला.


            यानंतर माजी नगरसेवक मुकुंद कोट ,ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत. "अ" प्रभाग कार्यालयात जात सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना जाब विचारल्याने बाचाबाची झाल्याचे माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी संपर्क साधला असता सांगितले.                        

    
            "याप्रकरणी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या शी संपर्क साधला असता  मोहने येथे अनाधिकृत जोत्याचे कामावर तोडक कारवाई केली असता वार्डात येत जाब विचारीत आपणास मारहाण प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी  खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये मुकूंद कोट यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले."

Post a Comment

0 Comments