भिवंडीत उड्डाणपूल निकृष्ट दुरुस्ती विरोधात मनसेची निदर्शने आंदोलन
भिवंडी दि 17 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाणी 2006 मध्ये बनविण्यात आलेला स्व राजीव गांधी स्मृती उड्डाणपूल मागील कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असून 2018 मध्ये या उड्डाणपुलास भगदाड पडल्या नंतर या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली .


           मागील वर्षी या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती साठी राज्य सरकारने तब्बल 7 कोटी रुपये दिल्याने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असुन त्यानंतर ही या उड्डाणपुलाचे नष्टचर्य संपले नसून  पुलावर सुरू असलेले दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जात आहे .


          या दुरुस्ती कामी वापरण्यात येणारे स्टील हे गंज प्रतिबंधक कोटिंग न केलेले वापरले जात असल्याचे दिसून आले त्याविरोधात मनसेचे  परिवहन कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गुळवी, मनसे  जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी ,शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलावर निदर्शने आंदोलन करीत महापालिका प्रशासनाचा धिक्कार केला आहे .या आंदोलनात अनेक मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Post a Comment

0 Comments