अॅज्वा फिनटेकद्वारे 'ईएमएसएमई सारथी'ची सुरुवात

■एमएसएमईंसाठी भारतभरात उपलब्ध असलेल्या योजना शोधण्यात मदत करणारा डिजिटल प्लॅटफॉर्म ~


मुंबई, ३० नोव्हेंबर २०२१ : लेखापालन, कर आणि एमएसएमईंशी निगडित अन्य सेवा पुरवणाऱ्या भारतातील भविष्यकालीन एण्ड-टू-एण्ड सोल्युशन पुरवठादार कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅज्वा फिनटेकने (AJVA) “ईएमएसएमई सारथी” नावाचा एक एमएसएमई स्कीम डिस्कवरी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. ही भारतातील अशा प्रकारची पहिलीच अनन्यसाधारण स्वयंचलित प्रणाली आहे. सर्व सुक्ष्म, छोट्या, मध्यम उद्योगांना सरकारी योजनांची माहिती पुरवण्यामध्ये एक पारदर्शकता आणून हा प्लॅटफॉर्म या क्षेत्रात विकासात्मक बदल घडवून आणणार आहे.


      ‘ईएमएसएमई सारथी’ हा प्लॅटफॉर्म नेव्हिगेशनसाठी आणि योग्य उपाय प्राप्त करण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. एमएसएमईंना योजनांची कस्टमाइझ्ड यादी शोधण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाची नेमकी ओळख (क्रिडेन्शिअल्स), उदाहरणार्थ एमएसएमई वर्गीकरण (सुक्ष्म/छोटे/मध्यम), उद्योगाचा प्रकार, एंटिटीचा प्रकार, व्यवसायाचे स्थळ आदी द्यावी लागते. क्युरेटेड योजना सूची सापडल्यानंतर वापरकर्ता त्याला उपलब्ध करून घेण्याची इच्छा असलेली योजना निवडू शकतो आणि प्रणालीमधून एक तपशीलवार निदानात्मक आव्हान निर्माण करू शकतो.


      ईएमएसएमई सारथीमध्ये “रेग्युलेटरी हेल्थ चेक” नावाची एक महत्त्वाची फंक्शनॅलिटी आहे. याद्वारे एमएसएमई अधिक सुसंघटित राहू शकतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसाय प्रवर्गासाठी आवश्यक ते सर्व परवाने व नोंदण्या आहेत की नाही हे त्यांना जाणून घेता येऊ शकते.


     एमएसएमईंना आवश्यक असलेल्या सर्व आर्थिक व अन्य बाबींच्या पूर्ततांसाठी वन-स्टॉप सोल्युशन पुरवणे हे अॅज्वा फिनटेकचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक क्लाएंटला सुलभीकृत सोल्युशन्स देऊन सहाय्य करण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे.


      अॅज्वा फिनटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकेश अग्रवाल या प्लॅटफॉर्मबद्दल म्हणाले, “आमच्या क्लाएंट्सना जाणवणाऱ्या समस्या व त्यांवरील सर्वोत्तम उपाय यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले वैविध्यपूर्ण मनुष्यबळ आमच्याकडे आहे. आमची समर्पित टीम सातत्याने संशोधन करत असते, गुंतागुंतीच्या आवश्यकता समजून घेते आणि वित्तीय प्रणाली, सरकारी योजना व संबंधित पूर्तता यांच्यात एक सखोल संबंध प्रस्थापित करते. माहितीची परिसंस्था जटील असल्यामुळे एमएसएमई स्कीम डिस्कव्हरी हे अखेरच्या वापरकर्त्यासाठी कायमच आव्हानात्मक राहिले आहे. 


        ईएमएसएमई सारथी ही एक आधुनिक परिसंस्था असून ती एमएसएमईंना भारत सरकारने जाहीर केलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन तर करतेच, शिवाय या व्यवसायांना एक पर्सनलाइझ्ड नियामक हेल्थ चेक रिपोर्ट व विविध कॉर्पोरेट तसेच संबंधित नियमांखाली मिळू शकणाऱ्या लाभांची यादीही पुरवते. आमचे मुख्य उद्दिष्ट एमएसएमईंना विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांना लेखापालन, करभरणा, नियमपूर्तता आदी क्षेत्रांमध्ये परवडण्याजोग्या दरात कस्टमाइझ्ड सेवा पुरवून संघटित राखणे हे आहे.”


       अॅज्वाने ajvafin.com ही वेबसाइटही सुरू केली आहे. येथून एमएसएमई नियामक व करभरण्याशी निगडित पूर्तता सेवा अत्यंत परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करून घेऊ शकतात.

Post a Comment

0 Comments