एसएसटी महाविद्यालयाचे प्रा. जीवन विचारे यांना एनएसएस चा उत्कृष्ट जिल्हा समन्वय पुरस्कार
कल्याण , प्रतिनिधी  : एस.एस.टी महाविद्यालयाचे उपप्राचार्यसहाय्यक प्राध्यापक जीवन विचारे यांना राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या,  २०२०-२०२१ या वर्षासाठीच्या  उत्कृष्ठ जिल्हा समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एस.एस.टी  महाविद्यालयामध्ये जीवन विचारे यांना एका  समारंभात  पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी  महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानीआईक्यू एसी समन्वयक डॉ. खुशबू  पुरस्वानी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग ही उपस्थित होते. या वेळी बोलताना जीवन विचारे यांनी एनएसएस मध्ये काम करण्याची आणि त्यासाठी वेळ देताना महाविद्यालयातील इतर कामातून सूट दिल्याबद्दल  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी आणि आई क्यू ए सी समन्वयक डॉ. खुशबू  पुरस्वानी यांचे आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण चमूचे देखील आभार मानले. सोबतच त्यांनी सुधीर पुराणिकसंचालक राष्ट्रीय सेवा योजना आणि कुलसचिवमुंबई विद्यापीठ आणि रमेश देवकरकार्यक्रम अधिकारी  मुंबई विद्यापीठ यांचेही विशेष आभार मानले.

Post a Comment

1 Comments