ट्रेडइंडियाची ४०० पेक्षा अधिक व्यावसायिकांच्या नेमणुकीची योजना

 


मुंबई, १९ नोव्हेंबर २०२१ : ट्रेडइंडिया या देशातील आघाडीच्या मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मने आगामी दोन महिन्यांत ४०० पेक्षा अधिक व्यावसायिक नेमण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. या नेमणुका विक्री, तंत्रज्ञान आणि इतर कॉर्पोरेट जबाबदाऱ्यांच्या क्षेत्रात होणे अपेक्षित आहे आणि ही कंपनी या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आपली मनुष्यबळ क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.


       आपली विस्तार योजना आणि कर्मचारी कल्याण योजनेचा भाग म्हणून ट्रेडइंडिया कार्यकारी ते सी सूट लीडरशिप अशा विविध क्षेत्रांमध्ये व्यापक टॅलेंट नेमणुका सुरू करणार आहे. महत्त्वाच्या पदांवर जसे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य उत्पादन अधिकारी, काही उपाध्यक्ष- तंत्रज्ञान, कार्यकारी संचालक- विक्री इत्यादींमध्ये नेमणुका केल्यानंतर ट्रेडमधील ही महत्त्वाची कंपनी आता संपूर्ण भारतभरात अधिक प्रमुखांना नेमण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी ट्रेडइंडिया देशभरात विविध प्रकारची नेमणूक ड्राइव्ह चालवेल. त्यात आघाडीच्या विद्यापीठ संकुलांमधून तंत्रज्ञान पदवीधरांच्या नेमणुकांचाही समावेश आहे.


      ट्रेडइंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप छेत्री म्हणाले की, ”ही जागतिक साथ खऱ्या अर्थाने अनेक कॉर्पोरेशन्ससाठी अत्यंत कठीण होती कारण त्यामुळे अनेक उद्योग ठप्प झाले. मात्र, आमच्या ग्राहकांना कार्यरत आणि सहभागी ठेवण्यासाठी डिजिटायझेशन जास्तीत-जास्त वाढवणे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्यावरील आम्ही लक्ष केंद्रित करत असून त्याद्वारे आम्ही एक अत्यावश्यक कोविड- सर्व्हायवल प्रवास सुरू केला आहे. 


        त्यात आम्ही केवळ जागतिक साथीमध्ये टिकलोच नाही तर साथीच्या कठीण काळात स्वतःला सिद्धही केले आहे. आगामी भविष्यासाठी विविध पदांवरील नेमणुका आणि रोजगाराच्या योजनांमुळे हे आकडे स्पष्ट होतात. आम्हाला आत्मविश्वास आहे की, ट्रेडइंडिया भविष्यात आणखी अनेक टप्पे पार करेल आणि ही कंपनी उद्योगातील एक महत्त्वाची कंपनी ठरेल.”


       देशातील सर्व क्षेत्रांमधून अधिक समावेशकता आणि बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारतातील टायर-२ शहरांमध्येही अधिकाधिक विक्री कार्यालये स्थापित करण्याचे नियोजन केले आहे. तसेच ट्रेडइंडिया संपूर्ण भारतभरात महत्त्वाच्या पदांवर महिला नेत्यांनाही नेमण्याच्या प्रयत्नात आहे, जेणेकरून महिला सक्षमीकरण आणि संस्थेत तसेच या क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढू शकेल. सर्व महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण याची खात्री करण्यासाठी कंपनीने त्यांना दर महिन्याला १ दिवसाची वेलनेस रजा त्यांच्या हक्कांच्या रजांसह देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करणे शक्य होऊ शकेल.


      कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कोविड-१९ कव्हरसह एक अत्यावश्यक मेडिक्लेमही देईल. यासाठी ट्रेडइंडिया डॉक्टर ऑन कॉल ही तात्काळ ऑनलाइन सपोर्ट सेवा सुरू करेल, जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्याचा फायदा होईल. तसेच या कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी लवचिक कामाच्या तासांचे धोरण अंगीकारले आहे. त्यात सध्या घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Post a Comment

0 Comments