सेल्फी विथ रांगोळी स्पर्धा "पारितोषिक वितरण समारंभ मनिषा पार्टे यांना प्रथम पारि तोषिक


ठाणे, प्रतिनिधी  :  ठाण्यातील आपला माणूस प्रतिष्ठानच्या वतीने व ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22 मधील खारकर आळी,महागिरी,खारटन रोड,मार्केट परिसर मधील महिलांकरिता ""सेल्फि विथ रांगोळी स्पर्धा"" दि.4 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत सो.मनिषा दयानंद पार्टे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.


          या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच ठाणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ.पल्लवी पवन कदम यांच्या हस्ते व ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण,प्रदेश काँग्रेस सचिव मनोज शिंदे व अनिस कुरेशी,आफताब शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सौ.मनिषा दयानंद पार्टे यांना मिळाले .


         तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नेहल रामजी जेठवा हिला मिळाले व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक धृवी रवि गोसावी या विद्यार्थिनीला मिळाले उत्तेजनार्थ पारितोषिक अश्विनी मच्छिंद्र बोराटे,भारती योगेश ससाने,ममता टाक,पायल नामदेव वाघुले,विद्या जितेंद्र पाटील,केतकी नितीन चौधरी,करिष्मा चिंडालिया,कविता संजय जाधव,सुजाता अंनत जंगम,अर्चना नरेंद्र पवार यांना देण्यात आले .


           या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता,स्पर्धेतील सहभागी झालेल्या सर्वच महिलांना मान्यवरांच्या उपस्थितीत भेटवस्तू देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments