■सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्या घरी चोरट्यांनी केली सशस्त्र चोरी तीन लाखांचा मुद्देमाल केला चोरट्यांनी लंपास मानपाडा पोलिसांचा तपास सुरू...
कल्याण , कुणाल म्हात्रे : देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. डोंबिवलीतील काटई येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्या घरी चोरट्यांनी सशस्त्र चोरी करत तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सामाजिक कार्याकर्ते गजानन पाटील हे आपल्या कुटूंबासह रविवारी अक्कलकोट,पंढरपूर येथे देव दर्शनासाठी गेले असता प्राणघातक शस्त्रांसह आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लाखो रूपए किमतीचे मौल्यवान सोन्या चांदिचे दागीने लंपास केले आहेत.
याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चोरट्यांचे शस्त्रांसह घरात प्रवेश व मुद्देमाल घेऊन जातानाचे सीसी टिव्हि फुटेज पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आहेत.
सीसी टीव्हि फुटेजमध्ये तीन चोरटे दिसत असले तरी या गुन्ह्यात आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही चोरी नसून सशस्त्र जबरी दरोड्याचा प्रयत्न असावा असेही गजानन पाटील यांना वाटू लागले आहे.
प्राणघातक शस्त्रांसह आलेल्या चोरट्यांमुळे पाटील कुटूंबिय भयभित झाले असून भविष्यात जिवित हानी होवू शकते याकडे वरीष्ठ पोलिस अधिकारी व गृह विभागाचे लक्ष वेधण्यासाठी गजानन पाटील पत्रव्यवहार करणार आहेत. त्याचबरोबर अशा चोरीच्या घटना या भागात अनेक वेळा घडल्या असून या भागातील नागरीकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
0 Comments