जो भित्रा असेल तो पक्ष सोडेल..काँग्रेस प्रदेश सचिवांचे वक्तव्य ...


डोंबिवली ( शंकर जाधव )  आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना विविध राजकीय पक्षांमध्ये आयराम-गयाराम सुरु झाले आहे.प्रत्येक पक्षाला आपले माजी नगरसेवक पक्ष सोडून जातील का ?किती नगरसेवक पक्षाला रामराम करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे.मात्र ज्यांना काँग्रेस पक्ष सोडण्याची इच्छा असेल त्यांना महाराष्ट्र काँग्रेस  सचिव संतोष केणे यांनी चांगलाच टोला  लगावला आहे.


      देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचा खूप मोठा सहभाग होता.म्हणूनच जो  सच्चा कार्यकर्ता असतो तो कधीच काँग्रेस पक्ष सोडणार नाही.जो भित्रा असेल तोच पक्ष सोडेल असेल असे वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे यांनी डोंबिवलीत केले.भारतीय संविधान दिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील निळजे स्टेशन जवळील लोढा हेवन येथील गावदेवी चौकातील काँग्रेस जिल्हा सरचिटणीस  शामराव यादव यांच्या कार्यालयात संविधान दिनानिमित्त इ श्रम कार्ड आणि मतदार नोंदणी शिबीर भरविण्यात आले होते.यावेळी  काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे आले होते.    यावेळी अजय पैळकरशशिकांत चौधरी,  एकनाथ म्हात्रेअजय भोईर,शरद भोईरप्रणव केणेराहुल केणेमंगेश रुके,मनोज यादवप्रवीण कदमअभिषेक मोहितेप्रशांत मोरेकुणाल रंगारी,लक्ष्मीनारायणशर्माजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते कधीच पक्ष सोडणार नसल्याचे यावेळी केणे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस श्यामराव यादवएकनाथ म्हात्रेशशिकांत चौधरी,अजय पौळकर,शरद भोईरप्रणव केणेराहुल केणे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.        तसेच वाढत्या पेट्रोल,डीझेलच्या किमती, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या  धोरणाचा  निषेध व इंधनदरवाढ व महागाई विरोधात कल्याण डोंबिवली जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जनजागरण अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस श्यामराव यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments