धनत्रयोदशीला ५५० हून अधिक एमजी अॅस्टर ग्राहकां कडे सुपूर्द
मुंबई, ८ नोव्हेंबर २०२१ : भारताची पर्सनल एआय असिस्टंट व फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्‍हल २) तंत्रज्ञान असलेली पहिली एसयूव्‍ही अॅस्टरला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर एमजी मोटर इंडियाने धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी ५५० हून अधिक वाहनांची पहिली बॅच ग्राहकांना सुपूर्द केली आहे. चिप्सचा तुटवडा पाहता ही अत्यंत लक्षणीय कामगिरी आहे. कंपनी डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत ४००० ते ५००० डिलिव्हरींचे सुरूवातीचे लक्ष्य पूर्ण कर ण्या साठी उपलब्धता सुधारण्याप्रती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


       नवीनच लाँच करण्यात आलेल्या अॅस्टरला ग्राहकांकडून सकारात्मक अभिप्राय मिळाला आहे आणि वर्ष २०२१ मध्ये बुकिंग्जना सुरूवात झाल्यापासून अवघ्या २० मिनिटां मध्येच याची विक्री फुल झाली. वर्ष २०२२ मधील अॅस्टर डिलिव्हरीसाठी बुकिंग्ज आता सुरू आहेत. ग्राहक ऑनलाइन किंवा जवळच्या एमजी मोटर इंडिया डिलरशिपला भेट देत बुकिंग करू शकतात. नऊ व्हेरिएंट्स आणि पाच आकर्षक रंगांसह नवीन एसयूव्‍ही एमजी अॅस्टर ९.७८ लाख रूपये या सुरूवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे.


एमजी अॅस्टरची वैशीष्ट्ये:


     एमजी अॅस्टर ही पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट -इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही आहे. इंटीरिअर्स कोमल व प्रिमिअम साहित्यासह आकर्षकरित्या डिझाइन करण्‍यात आले आहेत. ही वेईकल दोन इंजिन पर्यायांमध्ये येईल – ६- स्पीड एटीसह २२० एनएम इतके टॉर्क आणि १४० पीएस शक्ती देणारे ब्रिट डायनॅमिक २२० टूर्बो पेट्रोल इंजिन आणि दुसरी वेईकल – मॅन्युअल ट्रान्समिशन व ८- स्पीड सीव्हीटी, १४४ एनएम टॉर्क व ११० पीएस शक्‍ती देणारे व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन. अॅस्टरमध्ये एमजी आय- स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित ८० हून अधिक इंटरनेट वैशिष्ट्ये आहेत.


        तसेच सीएएपी (कार अॅज ए प्लॅटफॉर्म)ला पुढे घेऊन जात एमजी अॅस्टरमध्ये सब्स्क्रिप्शन्स व सर्विसेस, तसेच मॅप्स व नेव्हिगेशनसह मॅपमापइंडिया, जिओ कनेक्टिव्हीटी, कोईनअर्थचा अद्वितीय ब्लॉकचेन- प्रोटेक्ट वेईकल डिजिटल पासपोर्ट आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. एमजी कारमालकांना जिओसावन अॅपवरील म्युझिक, तसेच हेड युनिटच्या माध्यमातून रिव्हर्स पार्किंग स्लॉटचे इंडस्ट्री फर्स्ट वैशिष्ट्य (पार्क+सह समर्थित, सुरूवात करण्यासाठी शहरे निवडा) आणि विकीपीडियासह अमर्यादित माहिती उपलब्ध होण्याची सुविधा देखील मिळेल.


    एमजी अॅस्टरच्या वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये मानवासारख्या भावना आणि आवाजाची वैशिष्ट्ये जोडली आहेत. पॅरालिम्पिक अॅथलिट दीपा मलिकने वैयक्तिक एआय सहाय्यकाला आपला आवाज दिला आहे, ज्याद्वारे हा अनुभव वैयक्तिक पातळीवर सुलभ होईल.

Post a Comment

0 Comments