भिवंडीत संविधान बचाव महापरिषद मध्ये सामाजिक ,समाज हिताची कामे करणाऱ्यांचा सन्मान...


भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) भारतरत्न, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची जनजागृती आणि संविधानाचा बचाव  करण्यासाठी भिवंडी   तालुक्यातील शेलार इथं राहणारे संविधान बचाव महापरिषदेचे आयोजक  आणि काँग्रेसचे ठाणे जिल्हा महासचिव पंकज गायकवाड यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव महापरिषदेचे  शहरातील कोंबडपाडा येथील गजेंगी हॉल मध्ये आयोजन केले होते.


        यावेळी बहुजनांच्या हितासाठी संमजिक, समाजसेवेचे काम करणाऱ्या रेश्मा रुपेश सोनावणे, भगवान जाधव, विजय जाधव, रवि जाधव, दीपक राव, हेमंत जाधव, रमण जाधव, प्रदीप जाधव आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सर्वजीत बनसोडे,काँग्रेस महासचिव सोहेल खान,  ईटंकचे प्रदेश  सचिव सलाम शेख,श्रमजीवी संघटना उपाध्यक्ष रुपेश सोनावणे, आरपीआय युवा शहराध्यक्ष आंबादास गायकवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय गायकवाड, आरपीआय ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजय गायकवाड,बसपा  लोकसभा अध्यक्ष शाहिद अन्सारी, आरपीआय  कवाडे गट  शहर उपाध्यक्ष मोहम्मद सिद्दीक फकी, समाजसेवक राजु खोब्रागडे, शिवसेना स्थानिक नेते मुन्नाभाई, डोहळे ग्रामपंचायत सदस्य शुध्दोधन   जाधव, जितेंद्र आव्हाड युवा विचार मंचचे  सागर जाधव उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण, रतन चव्हाण यांनी केले आहे...

Post a Comment

0 Comments