ठाणकर पाडा प्रभागातील घोडेखोत आळीत गटार पायवाटांचे लोकार्पण

  

■आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सहकार्याने झाले काम नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश...


कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा प्रभागातील घोडेखोत आळी येथील गटार पायवाटांच्या कामाचे लोकार्पण रविवारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख आणि नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नाने आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सहकार्याने हे काम झाले आहे.


      कल्याण आग्रारोड वरील घोडेखोत आळी या ठिकाणी गेल्या ५ वर्षांपासून चांगला रस्ता आणि गटारे नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांनी शिवसेना शाखेत विभागप्रमुख आणि नगरसेवक मोहन उगले यांना याबाबत तक्रार केली. उगले यांनी या तक्रारीची दखल घेत पालिकेकडे पाठपुरावा करत येथील गटारे आणि पायवाटा यांचे काम मार्गी लावले आहे. या कामाचे लोकार्पण रविवारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी हे काम पूर्ण केल्याबद्दल नगरसेवक मोहन उगले यांचे आभार मानले आहेत.


      दरम्यान यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख मोहन उगले, शाखाप्रमुख स्वप्नील मोरे, अनंता पगार, उपशाखाप्रमुख संदीप पगारे, सचिन भाटे, पिंटू दुबे, मयूर चव्हाण, जय पालेकर, दुर्गेश गिरगावकर, अमोल जमदारे, अखीलेश गुप्ता, आदेश, निलेश सोलकर, उमेश भुजबळ, नितीन कदम  आदी शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्याप्रसंगी आमदारांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. 

Post a Comment

0 Comments