कल्याण पूर्वेतीत 'मयूर' शिल्पाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते लोकार्पण

  कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील लक्ष्मीबाग प्रभागातील म्हशीच्या गोठ्या पासुन काही अंतरावरच असलेल्या कचरा कुंडी काढून टाकल्या नंतरही या जागेवर कचरा टाकला जात होतो. हा प्रकार बंद व्हावा आणि परिसर कचरामुक्त होउन सुशोभित दिसावा या उद्देशाने सहयोग सामाजिक संस्थेने 'मयूरशिल्पाची निर्मिती केली आहे.


या शिल्पाचे लोकार्पण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या  हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी रामदास कोकरे यांनी नागरीकांना आवाहन केले की, नागरीकांनी कसल्याही परिस्थितीत रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये . कचरा हा घंटा गाडीतच टाकावा. 


घंटा गाडी बाबत काही समस्या असल्यास त्या संबंधीत अधिकार्‍यांना सांगाव्यात. यावेळी  स्थानिक नगरसेवक विशाल पावशेसहयोग संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले तसेच परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.           

Post a Comment

0 Comments