ओरिफ्लमेच्या लव्ह नेचर श्रेणीचा विस्तार

लव्ह नेचर फॉरेस्ट बेरीज डिलाइट श्रेणी लॉन्च केली ~


मुंबई, २८ नोव्हेंबर २०२१ : स्थापनेपासूनच ओरिफ्लेम या सोशल सेलिंग ब्युटी कंपनीने नेहमीच निसर्ग घडवत असलेल्या गोष्टींना महत्त्व दिले आहे. ओरिफ्लेमच्या तत्त्वामध्ये निसर्गाला अत्यंत विशेष स्थान असून निसर्गाप्रती हे प्रेम व आदर त्यांच्या उत्पादनांच्या लव्ह नेचर श्रेणीमधून दिसून येते. या भव्य श्रेणीअंतर्गत ओरिफ्लेम आता लव्ह नेचर फॉरेस्ट बेरीज डिलाइट हे स्वादिष्ट होममेड ट्रीट्सचे आनंददायी कलेक्शन सादर करत आहे. यामध्ये योगहर्ट शॉवर क्रीम, एक्सफोलिएटिंग बॉडी स्क्रब जॅम व योगहर्ट बॉडी क्रीमचा समावेश आहे.


       कोमल, सतेज व पोषणदायी रेसिपींच्या नवीन पिकसह या श्रेणीमधील सर्व सुत्रीकरणांमध्ये पोषण-संपन्न फॉरेस्ट बेरीजसोबत ब्लॅककरण्ट अर्क, ब्लॅककरण्ट सीड्स, लिंगोनबेरी अर्क, रॅस्पबेरी अर्क व वाइल्ड स्ट्रॉबेरी अर्क आहेत, जे क्रीमी ऑर्गेनिक योगहर्ट अर्कामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.


     जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि जीवनसत्त्व सी यासारख्या अॅण्टीऑक्सिडण्ट्सने संपन्न घटक पोषणयुक्त आहेत. बेरीजचे संयोजन त्वचेला मॉइश्चराईज करण्यासोबत कोमल व ताजेतावने करते आणि त्वचेची चमक वाढवते. ऑर्गेनिक योगहर्टमध्ये प्रथिने, कॅल्शियम व जीवनसत्त्वांचा संपन्न स्रोत आहे. लॅक्टिक अॅसिड सौम्यपणे त्वचेचे एक्सफोलिएट करते, तर क्रीमी टेक्स्चर त्वचेला सखोलपणे मॉइश्चराईज करते. या उत्पादनांच्या प्रत्येक श्रेणीमध्ये तुम्हाला रेड बेरीचा सुगंध येईल आणि ताजे बनवलेले जॅम व क्रीमी दहीच्या गॉरमण्ड टेक्स्चर्सचा अनुभव मिळेल.


     लव्ह नेचर फॉरेस्ट बेरीज डिलाइट एक्सफोलिएटिंग बॉडी स्क्रब जॅम हे अस्सल ब्लॅककरण्ट सीड्स असलेले रसाळ व स्वादिष्ट होममेड जॅम-प्रेरित स्क्रब आहे, जे त्वचेला कोमल करण्यासोबत एक्सफोलिएट करते. नॅच्युरल ब्लॅककरण्ट, रॅस्पबेरी, लिंगोनबेरी व वाइल्ड स्ट्रॉबेरी अर्क असलेले हे बायोडिग्रेडेबल जॅम-टेक्स्चर्ड सुत्रीकरण आल्हाददायी फॉरेस्ट बेरी सेंटसह त्वचेला कोमल व सतेज बनवते.


      आल्हाददायी लव्ह नेचर फॉरेस्ट बेरीज डिलाइट योगहर्ट बॉडी क्रीम नॅच्युरल योगहर्ट अर्क व नॅच्युरल फॉरेस्ट बेरीजने युक्त योगहर्ट-प्रेरित बॉडी क्रीम आहे. हलके, नॉन-स्टिकी सुत्रीकरण त्वचेला हायड्रेट व मॉइश्चराईज करते, ज्यामुळे त्वचा कोमल, सतेज व सुगंधी बनते. लव्ह नेचर फॉरेस्ट बेरीज डिलाइट योगहर्ट शॉवर क्रीम तोंडाला चव आणणा-या होममेड बेरी योगहर्ट रेसिपींमधून प्रेरित सिल्की-स्मूद सुत्रीकरणासह त्वचेची काळजी घेते. यामधील सॉफ्ट-फोमिंग व बायोडिग्रेडेबल सुत्रीकरण त्वचेला कोमल, सतेज व सुगंधी बनवते.

Post a Comment

0 Comments