मुंब्य्रातील पहिल्या कार्डियाक एम्बुलन्सचे लोकार्पण


ठाणे (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधान सभाध्यक्ष शमीम खान  यांच्या पुढाकाराने मुंब्रा येथील पहिल्या कार्डियाक एम्बुलन्सचे लोकार्पण रविवारी बशीर हजवानी यांच्या हस्ते  करण्यात आले. 


          मुंब्रा-कौसा भागातील एकाही रूग्णालयात कार्डियाक रूग्णवाहिकेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे गंभीर रूग्णाला मोठ्या रूग्णालयात दाखल करण्यासाठी ठाणे किवा नवी मुंबईतून कार्डियाक रूग्णवाहिका बोलवावी लागत होती. त्यासाठी बराच वेळ जात असल्याने रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत असे. 

         ही बाब ओळखून शमीम खान यांनी क्वीन्स केअर हॉस्पीटलच्या माध्यमातून कार्डियाक रूग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. आज दुपारी या रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. क्वीन्स केअर हॉस्पीटलच्या डाॅ. आफ्रीन सौदागर, शकील भाई आदी उपस्थित होते.


         यावेळी शमीम खान यांनी सांगितले की, कोरोना काळात मुंब्रा भागात कार्डियाक रूग्णवाहिकेची नितांत गरज असल्याचे जाणवले होते. त्यामुळेच आपण ही रूग्णवाहिका उपलब्ध केली आहे. माफक दरात ही रूग्णवाहिका सेवा पुरवली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments