एमजी अॅस्टर मध्ये ग्राहकांना मिळतात ही लक्झरीयस वैशिष्ट्ये


■लक्झरी कार्स हव्याहव्याशा का वाटतात याबाबत प्रश्न पडला असेल ना? या प्रश्नाचे उत्तर आहे लक्झरी कारमधील अतिरिक्त वैशिष्ट्ये, जी कार्सना अनेक कारप्रेमींसाठी आकर्षक व महत्त्वाकांक्षी अॅसेट बनवतात. कारमध्ये टचस्क्रिन इन्फोटेन्मेंटला बजेटपेक्षा प्रभावी वैशिष्ट्य मानण्याचा काळ उलटला आहे.


      प्रत्येकाची आपल्या कारमध्ये प्रगत वैशिष्ट्ये असण्याची इच्छा आहे, जे भारतीय रस्त्यांवरील त्यांचा प्रवास आरामदायी व सुरक्षित करतील. नियमित कार्ससाठी अनेक लक्झरी कार वैशिष्ट्ये आहे, जी आपल्या कारमध्ये असण्याची इच्छा होती. एमजी आता काही काळापासून भारतीय बाजारपेठेमध्ये कार्यरत असून बाजारपेठेत फक्त एसयूव्ही लाँच करत आली आहे. नुकतेच एमजीने भारतातील सर्वोच्च विक्री विभागाचा लाभ घेण्यासाठी त्यांची मध्यम-आकाराची एसयूव्ही अॅस्टर लाँच केली. ही हेक्टर, झेड५ ईव्ही व ग्लॉस्टर नंतर एमजीची भारतातील चौथी कार आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी उद्योगक्षेत्रामध्ये पहिल्यांदाच एआय-सक्षम कार सादर केली आहे. अॅस्टरला विभागातील प्रिमिअम कार बनवणारी काही लक्झरी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.


       एडीएएस लेव्हल २ सह सुरक्षितता: एप्रिल २०१९ पासून सरकारने एण्ट्री-लेव्हल वेईकल्ससह विक्रीवर असलेल्या सर्व नवीन कार्ससाठी मानक म्हणून ड्युअल फ्रण्ट एअरबॅग्ज व एबीएस असणे अनिवार्य केले आहे. अॅस्टरमध्ये एडीएएस पॅकेज आहे, ज्यामध्ये लेव्हल-२ ऑटोनॉमस ड्रायव्हर असिस्टण्स वैशिष्ट्ये आहेत- जसे अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइण्ड-स्पॉट डिटेक्शन आणि लेन-किपिंग असिस्ट व लेन डिपार्चर वॉर्निंग. एमजी अॅस्टरमधील इतर सुरक्षितताविषयक वैशिष्ट्ये आहेत- जवळपास सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, ईएसपी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्‍टार्ट व हिल डिसेंट कंट्रोल.

 


      ऑटो-डिमिंग ओआरव्हीएम: किंमत काही असो कार्समध्ये ऑटो-डिमिंग ओआरव्हीएम (आऊटसाइड रिअर-व्‍ह्यू मिरर) हे वैशिष्ट्य असलेच पाहिजे. हे वैशिष्ट्य फक्त प्रिमिअम कार्समध्ये असते. इलेक्ट्रिक ओआरव्हीएम ड्रायव्हरला वेईकल केबिनच्या आतूनच आरशे समायोजित किंवा नियंत्रित करण्याची सुविधा देते.


        टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम: कमी दाब असलेल्या टायर्समुळे इंधन कार्यक्षमतेसोबत ब्रेकिंगवर देखील परिणाम होतो. टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम ड्रायव्हरला इन्स्ट्रूमेंट क्लस्टरवर सर्व टायर्सची रिअल-टाइम माहिती देते.


      ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा: तुम्ही शहरामध्ये अधिक प्रमाणात ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला अरुंद जागेमध्ये कार पार्किंग करताना होणारा त्रास माहितच असणार. विहंगमय दृश्यासह ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरा ड्रायव्हरला कार पार्किंग करताना उत्तम सुविधा देऊ शकतो. हे निश्चितच महागडे वैशिष्ट्य आहे, कारण यासाठी अनेक कॅमेरे (किमान ४) व सॉफ्टवेअरची गरज आहे, जे या इमेजेसना एकत्र ठेवते. पण हे वैशिष्ट्य सोयीसुविधा व लक्झरी फॅक्टरला नव्या उंचीवर घेऊन जाते. एमजी अॅस्टर व्‍यतिरिक्त हे वैशिष्ट्य भारतातील बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ-बेन्झ, ऑडी व जग्वार लँड रोव्हर या प्रिमिअम ब्रॅण्ड्सच्या कार्समध्ये उपलब्ध आहे.


        पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह मेमरी: पॉवर्ड सीट क्षणात समायोजनांची सुविधा देत असल्यामुळे हे वैशिष्ट्य ड्रायव्हरला किमान अॅडजस्टेबल सीटसह सर्वोत्तम पोझिशनमध्ये येण्यास मदत करते. पॉवर्ड सीट्ससोबत मेमरी फंक्शन देखील ऑफर करता येऊ शकते, जेथे सीट्स बटनाच्या टचसह विशिष्ट अॅडजस्टमेंट लेव्हलमध्ये प्रोग्राम करता येऊ शकतात.


       सनरूफ: कारमध्ये सनरूफ मोठे लक्झरी ठरले आहे. हे वैशिष्ट्य काही लोकांनाच परवडू शकत होते. पण आता अनेक कार ग्राहक नवीन कार खरेदी करताना या वैशिष्‍ट्याला प्राधान्य देत आहे. सनरूफ्स लोकप्रिय होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ते लक्झरी कार्समध्ये उत्साहाची भर करतात. तसेच ते हवा खेळती राहण्यासाठी देखील वापरता येऊ शकतात आणि एसी कार्यक्षमता देखील सुधारू शकतात. एमजी अॅस्टरमधील सनरूफ मध्यम-आकाराच्या एसयूव्ही विभागामध्ये सर्वात मोठे आहे.

Post a Comment

0 Comments