जनतेनेच आता जातीयवादी शक्तिंना रोकले पाहिजे - नसीम खान



ठाणे , प्रतिनिधी  :  केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरीत्या महागाई वाढवून देशातील अर्थव्यवस्था उध्वस्त केली असून देशात जातीयवादी शक्ती सक्रिय झाली आहे जनतेनेच आता अशा जातीयवादी शक्तीला रोकले पाहिजे असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी ठाण्यात केले.


          अनिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात दि.14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा प्रारंभ आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली या प्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर,प्रदेश काँग्रेस सचिव अनिस कुरेशी,महेश कांबळे,मोहन तिवारी,सुखदेव घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते .


            या प्रसंगी बोलताना नसीम खान यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या काही धोरणात्मक निर्णयामुळे सर्व सामान्य जनता हवालदिल झाली असून देशातील व्यापार उद्योगात याचा खूप मोठा फटका बसला आहे साहजिकच त्याच्या परिणाम सर्व क्षेत्रातील संबधितांना बसत आहे,काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने जनआदोलन करित आली आहे तरिही केंद्रातील भा.ज.पा.सरकारला जाग येत नसून आता जनजागरण अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे सागितल.


           संपूर्ण महाराष्ट्रात हे जनजागरण अभियान राबविण्यात येणार असून 14 नोव्हेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी हे अभियान सुरू केले आहे असे सांगून संविधान दिनी म्हणजेच 29 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान चालू राहणार असून संपूर्ण शहरातील विविध भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात प्रामुख्याने वाढती महागाई,वाढती बेरोजगारी बाबत जनतेमध्ये जाऊन जनजागरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments