हिंदूंच्या सणांच्या वेळी जाहिरातींतून दुष्प्रचार करणार्‍यांवर हिंदूंनी आर्थिक बहिष्कार घालावा - चेतन राजहंस
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  हिंदूंच्या सणांच्या वेळी जाहिरातींतून दुष्प्रचार करणार्‍यांवर आर्थिक बहिष्कार टाकायला हवा. तसे केल्यास हिंदु धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने पहाणार नाहीअसे स्पष्ट प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंच्या सणांमध्ये होणारा दुष्प्रचार आणि सणांचे वैज्ञानिक महत्त्व’  या विषयावर आयोजित ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.


 सनातन हिंदु धर्मातील सर्वच सणउत्सव आणि व्रते ही पर्यावरणपूरकतसेच मानवासाठी हितकारक आहेतमात्र साम्यवादीजिहादीमिशनरीसिने-अभिनेतेसेक्युलर आणि नास्तिक लोक हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणार्‍या चळवळी राबवतात. पीके’ चित्रपटात अभिनेता आमीर खान म्हणतो की, ‘दगड (शिव पिंड) दूध पीत नाहीते गरिबांना द्या’; पण तो मृताला थंडी लागत नाहीतर मजारवर चादर कशाला 


ती गोरगरिबांना द्या’, असे का सांगत नाही होळी आली की, ‘पाण्याची बचत करा’, दिवाळी आली की वायूप्रदूषण टाळा’, असा प्रत्येक सणांच्या वेळी प्रचार होतो. पेटावाले म्हणतात, ‘मकर संक्रांतीला पतंग उडवू नकाकारण पतंगांमुळे पक्षी मरतात’; मात्र वर्षभर मोबाईलच्या वापरामुळे सर्वाधिक पक्षी मरतात. त्याविषयी ते का बोलत नाहीत हिंदूंनी संघटित होऊन या हिंदु धर्मविरोधकांच्या आक्षेपांचे सामाजिक माध्यमांवर वैचारिक खंडण करायला हवे असेही चेतन राजहंस यांनी सांगितले.  


       या वेळी जयपूर येथील ज्ञानम् फाऊंडेशनचे संस्थापक दीपक गोस्वामी म्हणाले कीचित्रपटांतून हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे. पुजारी हा बलात्कारीतर कुख्यात गुंडाला जय भवानी’ म्हणतांना दाखवले जाते. त्यामुळे हिंदू संभ्रमित होऊन धर्मापासून दूर जातो. 


          हिंदूंना धर्माचे योग्य शिक्षण दिल्यास ते अशा अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. धर्मावर आघात करणार्‍या अशा चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा. आपला हिंदु धर्मसंस्कृती आणि सण यांचे ज्ञान हे विज्ञानावर आधारित असल्यानेच पाश्‍चात्त्य लोक त्याचा अंगीकार करत आहेत. हे हिंदूंना लक्षात आल्यास ते अन्य पंथांकडे आकृष्ट होणार नाहीत.

Post a Comment

0 Comments