भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका सुशोभी करण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव यांची मागणी..


भिवंडी दि 18 (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होत असून वज्रेश्वरी, गाणेशपुरी, अकलोली हा धार्मिक स्थळ आणि गरम पाण्याचे कुंड असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक यांची वर्दळ असते अंबाडी नाका या ठिकाणाला जास्त महत्व आहे मात्र रस्त्याची दुरावस्था त्यात वाहनांची होणारी वाहतूक कोंडी यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, भाविक, पर्यटक यांना त्रास सहन करावा लागत असल्याने अंबाडी परिसरात  सुसज्य काँक्रीटीकरणं करणे अंबाडी चौकाचे सुशोभीकरण करणे.


        त्याच प्रमाणे वज्रेश्वरी - पडघा रोडवर डिव्हायडर बसवणे त्याच प्रमाणे वज्रेश्वरी रोडच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळ्यासाठी 10 बाय 20 ची जागा उपलब्ध करून द्यावी त्याच प्रमाणे वज्रेश्वरी - पडघा रोडवर डिव्हायडर लावताना रोडच्या दोन्ही बाजूला गटारे बांधण्यात यावी अशी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य कैलास दत्तात्रय जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे..

Post a Comment

0 Comments