लोक कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचा स्मृति दिन साजरा


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचा स्मृतिदिन लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा याठिकाणी साजरा करण्यात आला. अरविंद इनामदार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त लोक कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर भालेकर यांनी गरजूंना भेट फळ, अन्न, ब्लॅंकेट व गृहउपयोगी वस्तूंचे वाटप केले.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते हे होते. कार्यक्रमास मुंबई पोलीस उपायुक्त संजय पाटील, निवृत्त पोलीस उपायुक्त अरुण जाधव, माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक वरुण पाटील, मनसेचे राज्य सचिव इरफान शेख, उद्योजक राजेश रुपावत, मनसे शहर उपाध्यक्ष गणेश चौधरी, नंदकुमार देशमुख, रोहन पवार, विठ्ठल सानप योगेश गव्हाणे,  महेश भोईरसंतोष अमृते, गणेश लांडगे व चेतन म्हात्रे उपस्थित होते.


भुजंगराव मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की अरविंद इनामदार यांनीच त्यांना घडवले. त्यांच्या काळात मोक्का ताडा सारखे कायदे बनले. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. पुढे त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्दल सागर भालेकर आणि विठ्ठल सानप यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास अंध व गरजू उपस्थित होते. अंधांच्या संघटनेला भुजंगराव मोहिते यांनी पाच हजार रुपयाचा धनादेश भेट दिला. 

Post a Comment

0 Comments