कल्याणात भाजपचा महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध मोर्चा


कल्याण , कुणाल म्हात्रे :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर कामगारांवर  होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अमरावती  दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. 


       या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेशहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेमाजी उपमहापौर मोरेश्वर भोईरनगरसेवक मनोज राय, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन सादर केले.


महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. सरकारने  नेहमीच मायबापच्या भूमिकेत असले पाहिजे. मात्र हे सरकार विचित्र पध्दतीने वागत असल्याची टिका भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच अमरावती दंगल ही स्पॉन्सर्ड दंगल असल्यासारखे चित्र समोर यायला सुरुवात झाली असून लोकांना त्रास देणेसर्वसामान्य माणसाना वेठीस धरणेहे सातत्याने सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही यावेळीं त्यांनी केला. 


तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते कसे थांबवावे काय उपाययोजना करावी यासह एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना राज्य सरकार दिसत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सरकारचा निषेध करण्यासाठी हे 'जन आक्रोशआंदोलन करण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


दरम्यान भाजपा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाबाबत आमदार रवींद्र चव्हाण यांना विचारले असता, भाजप मधले अतिशय चांगले कार्यकर्ते होते. ते  कोणत्या कारणामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतात ते मला माहित नाही मात्र कार्यकर्ता भाजपमधून इतर पक्षात जाणं हे आमच्या सारख्यांना अत्यंत खेदाची बाब असून आमचच कुठेतरी चुकले असेल त्यामुळे कदाचित त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असेल असं सांगत त्या नगरसेवकाना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments