सहा महिन्यांनंतर मोलकरणीच्या पतीला अकरा तोळ्याच्या दागिन्यांसह अटक करण्यात आली

■एप्रिल २०२१ मध्ये चोरी झाली होती...गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला यश...


कल्याण, कुणाल  म्हात्रे ; - कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने सहा महिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत घरकाम करणाऱ्या पतीला अटक केली आहे. 


         हि घटना एप्रिल २०२१ ची आहे. चोरट्याच्या ताब्यातून गुन्हे शाखेच्या पथकाने ४ लाख ८० हजार ४४६ रुपये किमतीचे११ तोळे दागिने जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील लोढा हेरिटेजमध्ये मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेचा पती हितेश शांतीलाल छेडा ऊर्फ जैन याने मालकाच्या घरातून चार लाख ८० हजार ४४६ रुपयांचे दागिने चोरून नेले. 

 
         गेल्या सहा महिन्यांपासून क्राइम ब्रँचची टीम पती-पत्नी दोघांवर नजर ठेवून होती. अखेर ६ महिन्यानंतर सबळ पुरावे मिळताच मोलकरणीचा पती आरोपी हितेश शांतीलाल छेडा याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत छेडा याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले आहेत. 


          कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय माळी यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी या कारवाईत गुंतले होते.  सध्या पोलीस मोलकरणीचा पती छेडा याला ताब्यात घेऊन अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments