भागशाळा मैदानात शिवसेनेच्या वतीने विद्युत रोषणाई

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  दीपावली निमित्त डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे मैदान ( भागशाळा ) येथे स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे व युवा सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल म्हात्रे यांच्या वतीने भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली.रोषणाईने तरुणाई या मैदानात आकर्षित झाल्याने खूपच गर्दी दिसत होती.


        प्रकाशमय झाल्याचे पाहून ज्येष्ठ नागरिकांनी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे आणि युवा सेना पदाधिकारी राहुल म्हात्रे यांचे आभार मानले.यावेळी राहुल म्हात्रे म्हणाले, करोना काळात जगावर जणू काही काळच आला होता. सर्वजण भीतीच्या छायेखाली जगत होते. 


        मात्र आता करोना संकट आपल्यापासून दूर जात असल्याचे दिसत आहे.त्यामुळे करोनाच्या अंधारातून सकारात्मक प्रकाशाकडे जात असल्यानेया मैदानात रोषणाई केली आहे.

Post a Comment

0 Comments