डोंबिवलीतील सतरा विद्यार्थ्यांची बालचित्रकला प्रदर्शनासाठी निवड
डोंबिवली ( शंकर जाधव )  बाल दिना निमित्त एस .पी. मेमोरियल ट्रस्ट (मुंबई)च्या वतीने मुंबईतील  नेहरू सेंटर आर्ट गॅलरी  येथे होणाऱ्या ३३ व्या बालचित्रकला प्रदर्शनासाठी डोंबिवलीत १७  बाल कलाकारांची निवड झाली आहे. या बाल कलाकारांची चित्रे सुंदर आकर्षक व्हावी सर्व कलाकृतींची प्रदर्शनात एक वेगळी छाप पडावी या हेतूने  के. सी. गांधी शाळेचे चित्रकला शिक्षक अमोल पाटील यांनी या मुलांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले. 


         सतत  आठ दिवस विनामूल्य मार्गदर्शन करून प्रत्येक मुलाकडून एकापेक्षा एक अशा कलाकृती निर्माण करून घेतल्या विद्यार्थ्यांनी कॅनवास बोर्ड वरती ऍक्रेलिक रंगाच्या माध्यमातून डोंगर-दऱ्या ,नदी-नाले रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले झाडे ,सूर्योदय व सूर्यास्ताच्या रंग छटांनी आकाशाला आलेले आनंदाचे उधाण या रंगछटांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब, खडखड वाहणारी नदी, सर्वत्र हिरवा शालू नेसलेली सृष्टी अशी सुखद मनाला साद घालणारी एकापेक्षा एक सुंदर निसर्गचित्रे चितारली तर काही मुलांनी वारली पेंटिंग, मधुबनी पेंटिंग, मॉडर्न आर्ट ,अशा विविध विषयावर ५१ कलाकृती साकारल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंदी भाव चैतन्य रुपी उत्साह झळकत होता. 


          सर्व मुलांच्या कलाकृतीत नाविन्यपूर्ण रचना, रंगलेपन, रंगसंगती असल्याने सर्वच मुलांची चित्रे मनाला सुखद साद घालतात हे बालचित्र प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे  ९ ते १४नोव्हेंबर पर्यंत सुरू असणार आहे.

Post a Comment

0 Comments