लाल फित लावून वकिलांनी केला न्यायाधीशां वरील हल्ल्याचा केला निषेध कल्याण न्यायालयात वकिलांचे आंदोलन


कल्याण , कुणाल  म्हात्रे  कल्याण न्यायालयात सुनावणी दरम्यान एका कैद्याने  न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची घटना घडली होती. महिनाभरापूर्वी एका वकीलासोबत भर न्यायालयात धकाकबुक्कीची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


          अशा घटना वाढत असल्याने वकिलांनी संतप्त प्रीतिक्रिया व्यक्त केली. आज कल्याण न्यायालयात वकिलांच्या संघटनेने लाल फित लावून काम करत हल्ल्याचा निषेध नोंदवला. यावेळी वकिलांनी न्यायालयात वकील, न्यायालयाधीशांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत त्यामुळे न्यायालयात पोलीस संरक्षण वाढवण्यात यावे अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments