वडवली अटाळी प्रभागात विकास कामांचा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते शुभारंभ

                                                                                       


कल्याण , प्रतिनिधी   :  प्र.क्र.६ वडवली अटाळी प्रभागात शिवसेनेच्या माध्यमातून विविध विकासकामांच्या शुभारंभाचा धडका सुरू आहे. वडवली गाव परिसरात पोहच रस्तेगटारे कामाचे शुभारंभ कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रभाग क्र. ६ वडवली अटाळी प्रभागाच्या माजी नगरसेविका हर्षाली थवील यांनी राज्य शासनाकडे पाठ पुरावा करीत मुलभुत सुविधा अंतर्गत निधी प्राप्त करीत प्रभागात विकास कामे करीत प्रभागाचा कायापालट करण्याचा धडका सुरू ठेवला आहे.


शिवसेना ८० टक्के समाजकारण करते २० टक्के राजकारण करते. लोकाभिमुख कामासाठी शिवसेना नेहमीच तत्पर असते. लोकांच्या अडचणीत पहिली मदतीसाठी धावणाऱी शिवसेना असते. या ग्रामीण परिसरात विकासचा समतोल साधण्यासाठी मी आमदार निधीची कमतरता भासू देणार नाही या परिसरचा विकास करणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.


या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईरमाजी नगरसेवक प्रभुनाथ भोईरजयवंत भोईरदशरथ तरेदुर्योधन पाटीलशिवसेना कल्याण उपशहर प्रमुख माजी सभागृह नेता रवि पाटीलमाजी नगरसेविका हर्षाली थवील व्यापारी आसोशिएनचे नारायण पाटीलपोलीस पाटील वासुदेव पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी कलावती पाटीलरोशनी खत्री यांच्यासह समस्त शिवसैनिक युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments