कंगना राणावत यांना ठाणे काँग्रेस ने दिली इतिहासाची पुस्तकं भेट पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी


ठाणे , प्रतिनिधी  ; कंगना राणावत यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय गाठत कंगना राणावत हिला इतिहासाची पुस्तके पाठवली व तिला दिलेल्या पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली.


             वादग्रस्त सिने अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वातंत्र्यलढ्याविषयी काढलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध होत असताना ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील मुख्य पोस्ट कार्यालय गाढून  कगणा रागावत यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची सविस्तर माहीती असलेलं इतिहासाची पुस्तके पोस्ट केली.


           याप्रसंगी बोलताना ठाणे कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितले की कंगना राणावत यांना इतिहास माहित नाही तसेच ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याविषयी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून ,वक्तव्य करून कंगना राणावत यांना नक्की काय साधायचे आहे .


          या प्रसंगी उपस्थित असलेले इंटकचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले की कंगना राणावत यांची भाषा ही भाजपाचा छुपा अजेंडा असून त्यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप केला यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक,ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संदीप शिंदे,श्रीकांत गाडीलकर,सागर लबडे,लोकेश घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments