भिवंडीत एस.टी संपावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद; तर एसटीवर दगडफेक करणारा चालक गजाआड....


भिवंडी दि 28  (प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील एसटी महामंडळातील कर्मचारी तुटपुंजे वेतन त्यासोबतच एसटी महामंडळाचा शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणी करताच संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी चालक वाहक हे मागील कित्येक दिवसांपासून बेमुदत संप आंदोलन करीत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याने कल्याण डेपो मधील काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.


            त्याच वादातून एका संपकरी चालकाने कामावर हजर झालेल्या एसटी चालकाला शिवीगाळ करीत एसटीवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण - भिवंडी मार्गावरील कोनगाव हद्दीत घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात संपकरी चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत आज अटक केली आहे.  विठ्ठल बाळासाहेब खेडकर असे अटक केलेल्या चालकाचं नाव आहे.  सुरेश दिगंबर सावंत हे चालक कल्याण डेपोत कार्यरत असून ते संपात सहभागी होते.


           मात्र राज्य सरकराने पगारवाढ केल्याने काही कर्मचारी कालपासून कामावर हजर झाले. त्यामुळे संपकरी कर्मचाऱयांमध्ये फूट पडून वाद निर्माण झाले आहेत . त्यातच सावंत हे कामावर हजर होऊन काल सांयकाळच्या सुमारास एसटी  बस  घेवुन कल्याण ते भिवडी या मार्गाने प्रवासी घेवुन जात होते. त्यावेळी   कल्याण आगरतील संपकरी कर्मचारी चालक (आरोपी) विठ्ठल  खेडकर  याला सावंत हे संपात सहभागी नसल्याचे पाहून  राग आल्याने कोनगाव येथील चौकात एस.टी. बस रस्त्यात अडवुन चालक सावंत यांना  शिवीगाळ करून बसच्या समोरच्या  कचेवर दगडफेक करून  काच फोडली . 


        मात्र याघटनेमुळे बस मधील प्रवाशामध्ये एकच गोंधळ उडाला आणि घाबराहट पसरली होती .  दगडफेक केल्या नंतर आरोपी चालक फरार झाला होता त्याच्या विरोधात सावंत चालक यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीसानी त्याला आज अटक केली असून पुढील तपास कोन गाव पोलीस करीत आहे मात्र या घटनेमुळे आता एसटी कर्मचामध्येच वाद होताना पाहावयास मिळत आहे ...

Post a Comment

0 Comments