कै. शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ ब्लँकेट्स वाटप

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमूहाचे संचालक तथा संपादक ज्ञानेश्वर मुंडे व नरेश बाबू मुंडे यांच्या मातोश्री कै .शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या  स्मरणार्थ   दीपावली सणाचे औचित्य साधून रायगड जिल्यातील कळंब येथील पिंगलेवाडी येथे सुमारे २०० आदिवासी बांधवाना ब्लँकेट्सचे  वाटप करण्यात आले. 


         यावेळी ज्ञानेश्वर मुंडे म्हणाले कि,आम्हा भावंडाना आईनी शिकवण दिली आहे कि नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात द्या, सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करत  रहा. यावेळी आदिवासी बांधवानी मुंडे कुटुंबियांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments