जो बूथ जिंकेल तो निवडणूक जिंकेल- माजी आमदार नरेंद्र पवार

■नरेंद्र पवार यांच्या दौऱ्याने विदर्भात भटके विमुक्त आघाडीचे संघटन मजबूत..


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : भाजपा मध्ये बूथ रचनेला अतिशय महत्व असून जो बूथ जिंकेल तोच निवडणूक जिंकेल त्यासाठी भाजपाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरीपद्मश्री खासदार डॉ विकास महात्मे,नागपूर महानगर जिल्हा अध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार प्रवीण दटकेआमदार समीर मेघेआमदार पंकज भोयर आदींची भेट घेतली.


वाशीम येथे बंजारा समाजाचे आराध्या दैवत असलेल्या पोहरादेवी येथील जगदंबा देवी मंदिर व भगवान श्री.सेवालाल महाराज यांचे दर्शन घेवून मंदिराची व अन्नदान छत्र यांची पाहणी केली. महान संत  रामराव महाराज यांच्या समाधी स्थळावर हार अर्पण करून आदरांजली वाहिली. सोबत उपस्थित सर्व मान्यवरांनी भक्तीधाम येथे दर्शन घेतले. या धावत्या दौऱ्या दरम्यान दीग्रस जी - यवतमाळ  येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व मार्गदर्शन केले.


तर नागपुर ग्रामीण मधील खेतापुर गावातील गोपाल समाज वस्ती मध्ये नरेंद्र पवार यांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले. नागपूर ग्रामीण येथे गट ग्रामपंचायत चांपा येथे उपस्थित ग्रामपंचायत सदस्यनागरिक व पदाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले.  शहरी व ग्रामीण भागातील जिल्हा अध्यक्षांच्या भेटी घेऊन बूथ स्तरापर्यंत भटके विमुक्तांचे संघटन वाढविण्यासाठी चर्चा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments