हिंदी हायस्कूलचे प्राचार्य 'समाज गौरव' पुरस्काराने सम्मानित विश्व ब्राह्मण समाजाचा उपक्रम


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याणच्या सोनावणे कॉलेजमध्ये विश्व ब्राम्हण समाज कल्याणच्या वतीने आयोजित स्नेह मिलन आणि सन्मान समारोहात हिंदी प्रचार मंडळ संचलित हिंदी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज जोशीबागचे प्राचार्य ज्ञानेंद्र चतुर्वेदी यांना 'समाज गौरवपुरस्कारने सम्मानित करण्यात आले.

चतुर्वेदी हे कल्याणच्या विविध संस्थांशी संलग्न असून याआधी देखील सामाजिक आणि बौद्धिक कार्यासाठी त्यांना अनेक वेळा सम्मानित करण्यात आले आहे. ब्राम्हण समाजाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सोमैया कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सतीश पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मुख्य अतिथि म्हणून राम मंदिराचे  महामंडलेश्वर चंद्रदेव दास यांच्या समवेत बिर्ला महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. श्याम सुन्दर पाण्डेय यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.


विश्व ब्राह्मण समाज संस्थाचे अध्यक्ष डॉ. विजय पंडित यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा उल्लेख करत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य ज्ञानेंद्र चतुर्वेदी यांना 'समाज गौरवसम्मान मिळाल्याबद्दल हिन्दी प्रचार मंडळाचे अध्यक्षउपाध्यक्ष, महामंत्री यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी आनंद व्यक्त करीत प्राचार्य चतुर्वेदी यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments