भिवंडी तालुक्यातील देवरुंग येथील आगदुर्घटनेतील पीडितांना मदत मिळवून देण्यासाठी मनसेने दिले तहसीलदारांना निवेदन.


भिवंडी दि 18(प्रतिनिधी ) तालुक्यातील देवरुंग येथील सचिन सुरेश गोडे ह्या शेतकऱ्याच्या घरास लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालेले होते. संबंधित शेतकरी व त्यांचा  संपूर्ण कुटुंब आज बेघर होऊन त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे.  


        मनसेच्या वतीने तहसीलदार अधिक पाटील यांना निवेदन देत पीडित शेतकऱ्याला घर पुनर्बांधणी साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मिळावी व पंचायत समितीच्या माध्यमातून  तातडीने घरकुल मिळावे अशी आग्रही मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी ह्यांनी पत्राद्वारे केली. 


        सदर निवेदन देताना मनसेचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हा संघटक भारत पाटील तालुका संघटक मनोज म्हात्रे तसेच विभाग अध्यक्ष ऍड. सुनील देवरे, नवनाथ म्हात्रे, शाखाध्यक्ष रुपेश म्हात्रे, कृष्णा पाटील उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments