ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते अक्षर आनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न


डोंबिवली ( शंकर जाधव ) अक्षरमंच प्रकाशनाच्या अक्षर आनंद दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ इतिहासकार आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे हस्ते  फ्रेंड्स ग्रंथालयाचे दालनात करण्यात आले. अक्षरआनंदचे कार्यकारी संपादक डॉ. योगेश जोशी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संपादक हेमंत नेहेते यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. शेवडे यांनी अंकाचे कौतुक केले आणि फ्रेंड्स ग्रंथालयाचे पुंडलिक पै यांनी अंकास शुभेच्छा दिल्या. 


      यंदाच्या अक्षरआनंद दिवाळी अंकामध्ये देश विदेशातील लेखक व कवी यांचे साहित्य असून , साहित्यिक आणि प्रख्यात ज्योतिषी ॲड. डॉ. सोपान बुडबाडकर यांच्या षष्ठाब्दीपूर्ती निमित्याने त्यांच्या गौरवार्थ विशेष लेख, कविता व अनुभव आदी साहित्य अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. अक्षर आनंद दिवाळी अंकामध्ये डॉ. गिरीश महाजन , प्रा.डॉ.राम नेमाडे स्वानंद गोगटे, राजश्री मेणकुदळे , अर्चना वेखंडे, वि. ग. सातपुते , प्रशांत सहाणे( मलेशिया) आदी मान्यवरांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे.


         व्यक्तीपरिचय सदरांतर्गत देवेंद्र भुजबळ (रश्मी हेडे) , राजेंद्र गोसावी( ॲड रुपेश पवार) ,शमशाद बेगम मुल्ला ( निलिमा पाटील) आदी मान्यवरांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यात आला आहे. साहित्यिक आणि प्रख्यात ज्योतिषी ॲड. डॉ. सोपान बुडबाडकर यांच्या षष्ठाब्दीपूर्ती निमित्याने या अंकात त्यांच्या साहित्याचा आणि वार्षिक राशी भविष्याचा आनंद वाचकांना घेता येणार आहे. 


       ॲड सोपान बुडबाडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू चंद्रकांत शेवाळे, जयश्री बेलसरे, चंद्रकांत कुंभार , भालचंद्र पाटील , संजय घोसाळकर , कृष्णा चौधरी , अजिंक्य नाळोले , किशोर कोटकर, अशोक पुंडलिक , संदीप कुंभार , संतोष म्हाडेश्वर, नंदिनी सावंत , भीमसेन दिंडोशी , ॲड उमेश सिंह, के के तेंडुलकर , राजाराम रेणुसे , उत्तम रेडकर , सुषमा कुंभार , मारुती विश्वासराव , निलेश कोडोलीकर , अंजू के , प्रदीप शिंदे , शरद पायगुडे , बाळकृष्ण कासार , रिद्धी लांडगे , गिरिधर केळुसकर , नागेश सरपोतदार, मधुसूदन सुगदरे , अनिल घाग , दिनेश पाठाडे , कविता ठाकूर , कल्पना शिंदे , शशिकांत सावंत , मीना घोडविंदे , गुरुनाथ आंजर्लेकर आदी मान्यवरांनी उलगडून दाखवले आहेत.

Post a Comment

0 Comments