विद्या बैतुले ठरल्या कल्पक कलाकृतीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी

 


डोंबिवली  (शंकर जाधव ) महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, उपलब्ध पर्यावरणपूरक इको फ्रेंन्डली साधन-सामुग्रीपासून कल्पक कलाकृती तयार कराव्यात, इनरव्हिल क्लबच्या आयएसओचे संघटन वृध्दिंगत व्हावे, तसेच मैत्रीची अभेद्य साखळी तयार व्हावी, या हेतूने इनरव्हिल क्लब ऑफ देवनार या क्लबतर्फे आयएसओ मेंबरसाठी आकर्षक कलाकृती तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्या बैतुले या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत.


       इनरव्हिल क्लब ऑफ देवनार या क्लबतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेचे नाव होते terrarium making अर्थात काचेच्या पात्रात कमी पाण्यात जगू शकतील अश्या छोट्या वनस्पती इको फ्रेंन्डली साहित्याने लावणे व कल्पकतेने सजविणे. या अत्यंत कल्पक स्पर्धेत इनरव्हिल क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या आयएसओ विद्या बैतुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्या बैतुले यांनी रंगीत छोटे दगड, शेवाळे आणि कोवळा बांबूच्या साह्याने अत्यंत देखणी कलाकृती तयार केली. या कलाकृतीमधील बांबूच्या पायऱ्या विशेष लक्षवेधी आहेत. 


       विद्या बैतुले यांच्या कल्पकतेची दखल घेऊन त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या कलाकृतीची सर्व स्तरातून प्रशंसा व अभिनंदन होत आहे. तसेच या स्पर्धेत एकूण १२ आएसो मेंबर्सनी भाग घेतला होता. विद्या बैतुले यांना वाचनाची आवड असून त्यांच्या घरातील एक मोठे कपाट विविध विषयांवरील पुस्तकांनी खचाखच भरले आहे.


       घराचा एक कोपरा आकर्षक सजावटीने, तर दुसरा कोपरा पुस्तकाच्या कपाटाने त्यांनी शोभीवंत केलेला आहे. ही कल्पक स्पर्धा आयोजित केल्याबदल इनरव्हिल क्लब ऑफ देवनार या क्लबचे पण विशेष अभिनंदन होत.

Post a Comment

0 Comments