सामाजिक कार्यकर्ते रोहन जाधव यांच्यासह शेकडो जणांचा राष्ट्रवादीत प्रवेशठाणे (प्रतिनिधी) -  राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत साईसिद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन जाधव यांच्यासह सुमारे 250 युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.


        यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, कळवा मुंब्य्रात झालेला विकास हा सबंध ठाणे शहरासाठी आदर्श आहे. या विकासामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांना आशेचा किरण वाटत आहे. त्यातूनच अनेकजण पक्षात प्रवेश करीत आहेत,  असे सांगितले. 


        रोहन जाधव हे कळवा आणि भिवंडी भागात सामाजिक कार्य करीत आहेत. तसेच, सामाजिक चळवळींमध्येही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. साई सिद्धी फाऊंडेशनच्या माध्यमातून ते गरीब आणि गरजूंना वैद्यकीय मदत पुरवित असतात.  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या समतावादी विचारधारेला अभिप्रेत राहून ते गेली अनेक वर्षे सामाजिक काम करीत आहेत. 


      आज सकाळी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. आव्हाड यांच्या निवासस्थानी आपल्या अडीचशे सहकार्‍यांसह त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. दरम्यान,  डॉ. जितेंद्र आव्हाड हे समतेचा विचार प्रसृत करीत असल्याने त्यांच्या विचारधारेखाली कामाच्या कक्षा रुंदावल्या जाणार असल्यानेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे रोहन जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments