राष्ट्रवादीच्या वतीने मतदार नोंदणी अभियान

 


ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली सबंध ठाणे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. 


         गेल्या काही दिवसांपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अनेकांची नावे वगळण्यात आलेली आहेत. त्यांच्या नावांचा पुन:समावेश करुन देण्यासाठी तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची मतदार यादीत नावनोंदणी करण्याच्या अनुषंगाने अर्ज क्रमांक 6, 7, 8, 8अ आदी अर्ज भरुन  घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 


        या साठी ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्ये बूथ उभारण्यात आले असून मतदार यादीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, रेशनिंग कार्ड, वीज बिल आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्र आदींसह राष्ट्रवादीच्या मतदार नोंदणी बूथवर अथवा राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, कौशल्य रुग्णालयाच्या शेजारी  गणेशवाडी येथे संपर्क साधावा, असे आवाहनही आनंद परांजपे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments