कंगना राणावतच्या पुतळ्याला चप्पल मारो आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना राणावत हिने १९४७ साली देशाचे स्वातंत्र्य हे भिक म्हणून मिळाले असून खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाल्याचे वक्तव्य केल्याने देशभरात संतप्त प्रतिक्रिया येत असून कल्याण मध्ये देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष कंगना विरोधात आक्रमक झाला असून टाटा पावर नाका येथे कंगनाच्या पुतळ्याला चप्पल मारत काळे फासण्यात आले.


डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयपाल कांबळे यांच्या नेत्तृत्वाखाली पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या पुतळ्यावर चप्पलांचा वर्षाव केला. तसेच मानपाडा पोलिसांना निवेदन देत कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 


या आंदोलनात  डॉ बाबासाहब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुन्द्रे माजी नगरसेवक कैलाश शिंदे, शिवसेना अल्पसंख्यक उप शहर प्रमुख यूसुफ मेमन, शिवसेना महिला आघाड़ी सनम शेख, डॉ शुक्लामदीना पटेल, जैतून कच्ची, वसीमा शेख, राजेश गरासे, ठाणे ज़िला युवक अध्यक्ष हरीश इंगळे, मुस्तफा अंसारी, संतोष वाघमारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राकेश शिरसागर आदिजण  सहभागी झाले होते.


          अभिनेत्री कंगना राणावत हि युवकांमध्ये प्रसिद्ध आहे मात्र ज्याप्रमाणे चंद्रामध्ये डाग आहे त्याचप्रमाणे कंगनाच्या चारित्र्यावर  देखील वादाच्या वक्तव्यांमुळे डाग आहे. तिच्या स्वातंत्र्याच्या वक्त्यव्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळेच आज हे आंदोलन करण्यात आले असून कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे नरसिंग गायसमुद्रे यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments