कल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा बाधित करण्याला नागरिकांचा विरोध


■स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत रस्ता रुंदीकरणाच्या नावा खाली डॉ. आंबेडकर उद्यान बाधित करण्याचा डाव...


कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याणातील आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले ते सुभाष चौक मधील २४ मीटरचा ३० मीटर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बाधित होणार असल्याने आंबेडकरी जनते मध्ये संतापाची लाट पसरली असून प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पालिकेत लेखी हरकती नोंदवीत आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी दलित मित्र आण्णा रोकडेआंबेडकरी चळवळीतील बाबा रामटेकेभारत सोनावणे, सुदाम गंगावणे, कुमार कांबळे, संजय जाधव, शेखर केदारे, विलास गायकवाडराजू रंदवेरंजना जाधव आदी उपस्थित होते.


       कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या पुर्वी मुरबाड रोड रस्ता रुंदीकरणासाठी दोन वेळा या उदयानाची जागा घेतलेली होती तसेच रुक्मिणीबाई हॉस्पिटलसाठी  उदयानाची काही जागा रस्त्यासाठी घेण्यात आली होती. त्यावेळेस सदरचे ठिकाणे केडीएमसी विकसित करून देणार होती. परंतु आजपर्यंत सदरचे ठिकाण विकसित केले नाही. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आबेडकर उदयानाची जागा रस्ता रुंदीकरणाअंतर्गत केडीएमसी  घेत आहे.  याबाबत प्रशासनाने हरकती सूचना प्रसिद्ध केली असुन कल्याण डोंबिवली मनपाच्या मुख्यालयसह प्रभागक्षेत्र नागरी सुविधा कार्यालयात हजारो हरकती अर्ज दाखल करण्यात आले.


       सन १९९६ च्या शहर विकास आराखडया प्रमाणे २४ मीटरर्स रस्ता हा शहरी भागासाठी परिपुर्ण आहे. तरी केडीएमसी या उदयानाची जागा रस्त्यासाठी घेत आहे. केडीएमसी जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा बाधित करीत असल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायी करत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या पुर्वी घेतलेली जागा वाढवून दिलेली नाहीच मात्र पुन्हा नव्याने रस्ता रुंदीकरणासाठी केडीएमसी उद्यानाची जागा घेत असल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायांनी केला आहे.


      स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक बाहेरील परिसर विकसित करण्यात येणार असून त्याच्या अंतर्गत कल्याण पश्चिम मधील महात्मा फुले चौक ते सुभाष चौक पर्यँत केडीएमसी २४ मीटरर्सचा ३० मीटर करण्यात येणार असून यात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाधित होणार असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणत नाराजी पसरली आहे. कल्याण पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालया लगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे आबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असून या उद्यानातील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी समाजाचे अनुयायी एकत्र येत असतात.


तसेच आंबेडकरी चळवळीचे  मुख्य ठिकाण असल्याने या उद्यानाशी समाजाची नाळ जुळालेली असल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासाठी रस्ता रुंदीकरणात उद्यान बाधित होणार असल्याने कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सोशल मीडियावर जनतेला जागृत करून हरकती घेण्याचे आवाहन केले होते त्याला नागरिकोनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. गुरुवार ११ नोव्हेंबर रोजी कल्याण पश्चिम मधील आंबेडकर उद्यान मध्ये एकत्र येऊन लेखी हरकती घेतल्या तर काहीं आबेडकरी संघटनांनी पालिका मुख्यालय मध्ये धाव घेत लेखी हरकत घेतली.


याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की उद्या पालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील मग पुढील धोरण ठरवले जाईल, तर सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सांगितले की आज हरकती नोंदवत असून उद्या आम्ही आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू असे रामटेके यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेने हा प्रश्न हाताळला नाही तर सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments