८५वर्षीय वृध्देचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचावासाठी आमरण उपोषण सुरू


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानचा काही भाग हा  रस्ता रुंदीकरणात बाधित होणार असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात एका ८५ वर्षीय आजीबाईने आज पासून उद्यानातच आमरण उपोषणास सुरवात केली आहे.


कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत महात्मा फुले चौक ते सुभाष चौक पर्यंतचा २४ मीटरचा रस्ता ३० मीटर पर्यंत करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत हजारो नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे लेखी स्वरूपाच्या हरकती घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी दोन वेळेस रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत उद्यानाची जागा पालिकेने बाधित केली होती. मात्र त्यावेळेस उद्यानाला पुरेशी जागा होती मात्र तिसऱ्यांदा उद्यानाची जागा घेण्यासाठी पालिका प्रशासन कार्यरत झाल्याने कल्याण परिसरातील आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले आहेत.


मोक्याच्या ठिकाणी असलेल्या उद्यानाला गालबोट लागण्यापूर्वीच आंबेडकर अनुयायी संघर्षाच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत.  कल्याण परिसरातील ८५ वर्षाच्या वयोवृद्ध लक्ष्मीबाई मारुती ससाने या डॉ. बाबासाहेब  आंबेडकर उद्यानात पालिकेच्या निर्णयाविरोधात उपोषणास बसल्या आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या त्या सक्रिय उपासिका असून त्यांच्या उपोषणाने कल्याण शहरातील आंबेडकरी वसाहतींमधील वातावरण ढवळून निघाले आहेत.

Post a Comment

0 Comments