खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई शहरात विकास कामांची आज पाहणी व भूमिपूजन सोहळा संपन्न


ठाणे, प्रतिनिधी :-  ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या प्रयत्नाने आज नवी मुंबई शहरातील ऐरोली विधानसभा व बेलापूर विधानसभा मतदार संघातील कामांची पाहणी व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. 


           त्यावेळी ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, बेलापुर विधानसभेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, नगरसेवक एम के मढवी, करण मढवी, संजू वाडे, नंदा काटे, नवीन गवते, राजेश गवते, दीपा गवते, अपर्णा गवते, जगदीश गवते, शुभांगी गवते, रवी पाटील, मिलिंद पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, गुमस्ते, मदन वाघचौरे, अजय संखे, मनोज पाटील व इतर शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


          या नवी मुंबई शहरात विकास कामांचा पाठपुरावा खासदार राजन विचारे गेली २ वर्षापासून करीत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चौकांच्या सुशोभीकरणाच्या कामांची पहाणी व भूमिपूजन सोहळा आज करण्यात आला. या पाहणीची सुरुवात नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वाराजवळून म्हणजे पटणी व बेलापूर रोड वरील दिघा चोकातून करण्यात आली.


■ दिघा मैदानात येथील संत निरंकारी मंडळामार्फत दरवर्षी समागम या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले जाते. त्यासाठी महाराष्ट्र राज्याबरोबर इतर राज्यातील नागरिक याठीकानी येत असतात. म्हणून या चौकात एन आकाराची प्रतिकृती दाखविण्यात आली आहे. या कामाचे भूमिपूजन आज खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले.


■ऐरोली सेक्टर ३ राजीव गांधी मैदानाच्या विकासासाठी क्रिकेट, बॅडमिंटन, हॉलीबॉल पीच विकसित करून प्रेक्षक गॅलरी विकसित करण्याचे काम सुरु असल्याने पाहणी करण्यात आली.


■ऐरोली दिवा गाव येथे स्कल्पचर उभे करून या परिसरात शोभिवंत झाडे लावून परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.


■ घणसोली येथील प्रभाग क्रमांक ३५ सेक्टर ८ मधील टेंम्पटेशन चौकात अत्याधुनिक पद्धतीचे कारंजे बसवून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.


■गवळीदेव व सुलाईदेवी या डोंगर पायथ्याशी प्रवेशद्वाराचे काम सुरू केले असून २-दीपस्तंभ व मिरर वॉल विकसित करण्यात येणार आहे.त्या कामाची पाहणी करण्यात आली.


■ बेलापूर येथील सेक्टर ११ येथील कोकण भवन समोरील चौकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.


■बेलापूर येथील सेक्टर २ छत्रपती शिवाजी महाराज सर्कल सुनील गावस्कर मैदाना समोरील चौकात घोड्यांची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. या कामाची पाहणी करण्यात आली.


■त्याच बरोबर बेलापूर एअर इंडिया कॉलनी व अपोलो हॉस्पिटल समोरील आम्र मार्ग चौकाचे सुशोभीकरण सुरु झालेल्या कामाची पाहणी करण्यात आले.


■नेरूळ सेक्टर ४२ सावला हॉस्पिटल समोरील चौकात अत्याधुनिक पद्धतीचे कारंजे बसवून परिसर सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्या जागेची पाहणी करण्यात आली.


■सानपाडा येथे झाशीची राणी मैदानात कबड्डी साठी ग्राउंड, हॉलीबॉल पीच नेट प्रॅक्टिससाठी, क्रिकेट पिच, फुटबॉल पीच, शौचालयाची सुविधा अशा एक अनेक सुविधा या मैदानामध्ये देऊन नागरिकांना उत्तम असे खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे याची पाहणी खासदार राजन विचारे यांनी आज केली.


Post a Comment

0 Comments