अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने महिलांसाठी स्व संरक्षण


कल्याण  , प्रतिनिधी  : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून अभाविप कल्याणकडून 'मिशन साहसीया गतिविधी अंतर्गत 'स्त्री उमंगहा कार्यक्रम ज्यामध्ये विद्यार्थिनी व महिलांसाठी स्व संरक्षण प्रशिक्षण व खुला संवाद असे सत्र घेण्यात आले. स्व संरक्षण प्रशिक्षक नुपूर घोलपकल्याण शहर मंत्री अमोल शिंदे व कल्याण शहर एसएफएस प्रमुख स्नेहा शिर्के यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. 


           कार्यक्रमाचे पहिले सत्र 'स्व संरक्षणहे नुपूर घोलप व दुसरे सत्र 'खुला संवाद एड. अर्चना सबनीस यांनी घेतले. दोन्हीही सत्रांना विद्यार्थीनी व महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद आला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.

Post a Comment

0 Comments