जिजाऊ सामाजिक संस्थेची कृतज्ञतेची भाऊबीज उत्साहात


■१०हजार आशा सेविकांना निलेश सांबरे यांच्याकडू पैठणी साड्यांचे वाटप...


कल्याण, कुणाल म्हात्रे  जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्याकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आशा सेविकांना भाऊबीजेच्या दिवशी कृतज्ञतेची भाऊबीज या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात अत्रे रंगमंदिर येथे १६८ आशा सेविकांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले.

 


कोरोना काळात अशा सेविकांनी समाजामध्ये जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना झालेल्या रुग्णांची सेवा केलेली आहे. कोरोना पेशंट शोधण्यापासून ते रुग्णाला ॲडमिट करे पर्यंत तसेच त्याला संपूर्ण उपचार व औषधे उपचार मिळण्याची जबाबदारी शासनाने अशा सेविकांवर सोपवली होती. अशा सेविकांनी जीवाची पर्वा न करता न घाबरता कोरोना काळात आपली प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. 



या विषेश कार्याची दखल घेऊन जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी या भगिनींनी सामाजिक भावनेतून त्यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून कृतज्ञतेची भाऊबीज हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात दहा हजार अशा सेविकांना पैठणी साडीची भेट देण्यात आली.



या उपक्रमास कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आशा सेविकांनी प्रचंड प्रतिसाद देत अत्रे रंगमंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी १६८ हून अधिक आशा सेविकांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले. कोरोणा सारख्या कठीण परिस्थितीत आम्ही काम करून सुद्धा आमच्या कार्याची कोणीही दखल घेत नव्हते परंतु आमचे मोठे भाऊ निलेश सांबरे यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला आज पैठणी दिल्यामुळे खूप आनंद झाला आहे आम्ही जिजाऊ संस्थेचे खूप आभार व्यक्त करतो असे येथील उपस्थित आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले.


 

       या प्रसंगी जिजाऊ संस्थेचे प्रज्वल पाटीलमाजी नगरसेविका विजया पोटेसामाजिक कार्यकर्ते  संजय पारेकरनाभिक समाज अध्यक्ष अविनाश सोनवणेसमाजसेवक संदीप तरेपत्रकार संभाजी मोरे,  माजी नगरसेवक अरविंद पोटे,  आरोग्य विभाग अधिकारी रितेश जाधवजिजाऊ टिटवाळा शाखा अध्यक्ष कुणाल खिस्मतरावमनसे शाखाध्यक्ष संदीप पंडित आदीजण उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments