कल्याणचे गिर्यारोहक भूषण पवार यांच्याकडून नवरा नवरी सुळके सर


■सीमेवरील सैन्य आणि कोरोना योद्ध्या पोलिसांना दिली मानवंदना...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणचे गिर्यारोहक भूषण पवार यांनी नाशिक जिल्हातील नवरा नवरी सुळके सर केला आहे. हे सुळके सर करत त्यांनी तिरंगा फडकावत सीमेवरील सैन्य आणि कोरोना योद्ध्या पोलिसांना मानवंदना दिली आहे.


नाशिक जिल्ह्यातील त्रिम्बकेश्वर मधील पहिने गाव म्हणजे चहू बाजूने सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या,कड्या कपाऱ्या,घनदाट जंगल आणि वन्यप्राणी ह्यांनी भरलेला निर्जीव परिसर. अश्या ह्या परिसराला सह्याद्री पर्वत रांगचं विशेष देणं लाभल्या मुळे हा परिसर अजूनच निसर्गरम्य दिसतो. पहिने वाडीच्या एका बाजूला विशेष महत्त्व प्राप्त झालेला अंजनेरी पर्वत तर त्याच्या दुसऱ्या बाजूलाच दुर्गभंडार आणि  ब्रम्हगिरी असे दोन विस्तृतपणे पसरलेले किल्ले दिसतात आणि ह्याच परिसरात आहेत "नवरा आणि नवरी" २६० उंचीचे सरळ एक रेषेत उभे असणारे दोन सुळके.  हे सुळके सर करायला केवळ साहसाची गरज नाही तर गिर्यारोहणचे तांत्रिक ज्ञान सोबत शारीरिक क्षमतेची गरज असते.


याच नवरा नवरी सुळक्यावर कल्याणचे गिर्यारोहक भूषण राजेंद्र पवार यांनी आपल्या तंत्रशुद्ध गिर्यारोहणाच्या अनुभवाचा वापर करून मोहीम यशस्वी करून देशाच्या सैनिकांना मानवंदना दिली. आपल्या चिमणी क्लायंबिंग आणि राप्पेल्लिंग च्या साहाय्याने भूषण पवार ह्यांनी ही मोहीम यशस्वी करून दाखवली.


 याआधी ही हे सुळके  सर करण्याचा प्रयत्न हा आम्ही केला होता पण काही तांत्रिक अडचणी मुळे मोहीम रद्द करावी लागली होतीशेवटी तांत्रिक अडचणी वर मात करून ही मोहीम देशाच्या सीमेवर लढणारे सैन्य आणि कोरोना काळात रक्ताचं पाणी करून सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्र पोलीस यांना ही मोहीम समर्पित करीत असल्याचे भूषण पवार यांनी सांगितले.


दरम्यान एवरेस्ट सारखी मोठी मोहीम फत्ते करून महाराष्ट्र राज्याचे नाव देशात मिरवायचे आहे आणि त्यासाठी लवकरच प्रयत्नांना लागणार असल्याचेही भूषण पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments